नांदेड : यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा जोरदार पाऊस रविवारी रात्री बरसला़ ८ जुलै रोजी झालेल्या पावसानंतर शहरात रविवारी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले़ तिन्ही नक्षत्र कोरडे गेल्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ दिवसेंदिवस वातावरणातील कोरडेपणा कायम असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पुनर्वसू नक्षत्रात दोन वेळेस पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ रविवारी दिवसभर उकाडा जाणवत होता़ घामाच्या धारांनी वैतागलेल्या नांदेडकरांना रात्री मात्र पाऊसधारांनी चिंब भिजविले़ अर्धा तास झालेल्या या पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले होते़ तर नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहत होते़ (प्रतिनिधी)
रविवारी नांदेडात जोरदार पाऊस
By admin | Updated: July 14, 2014 01:02 IST