शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक कोटा रद्द करणाऱ्या याचिकांवर २५ नोव्हेंबरला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:27 IST

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील परिपत्रकास आव्हान \Sऔरंगाबाद : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील विभागानुसार ७०/३० कोटा आरक्षण रद्द करणाऱ्या शासनाच्या परिपत्रकास आव्हान ...

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील परिपत्रकास आव्हान

\Sऔरंगाबाद : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील विभागानुसार ७०/३० कोटा आरक्षण रद्द करणाऱ्या शासनाच्या परिपत्रकास आव्हान देणाऱ्या राज्यातील सर्व याचिकांवर २५ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठात एकत्रितपणे सुनावणी होणार आहे.

औरंगाबाद खंडपीठात ४ याचिका दाखल झाल्या आहेत. नागपूर खंडपीठाने सोमवारी (दि.९) एक याचिका औरंगाबाद खंडपीठाकडे हस्तांतरित केली आहे. अशाच याचिका मुंबई मुख्य पीठात दाखल झाल्या आहेत. या याचिकांमध्ये परस्पर विरोधी आदेश टाळले जावेत यासाठी ही एकत्रित सुनावणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने ७ सप्टेंबर २०२० ला परिपत्रक काढून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील विभागानुसार ७०/३० कोटा आरक्षण रद्द केले. हा निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. ७०/३० कोट्याप्रमाणे वैद्यकीय प्रवेश दिल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासाच्या ठिकाणापासून जवळच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्राधान्य दिले जाते. मागील ६ महिन्यांपासून कोरोना परिस्थितीमध्ये विद्यार्थी गोंधळलेले आहेत. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी ७०/३० प्रमाणे परीक्षेची पूर्वतयारी केलेली होती. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून घाईने हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाने २०१६ साली नागपूर खंडपीठामध्ये ७०/३० कोटा प्रक्रियेचे समर्थन केले होते.

शासनाचे ७ सप्टेंबरचे परिपत्रक रद्द करावे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ७०/३० विभागीय कोटा प्रमाणेच राबविण्यात यावी अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.

याचिकाकर्त्यातर्फे ॲड.शिवराज कडू पाटील व ॲड.अनिकेत चौधरी , ॲड.ए.जी . आंबेटकर , ॲड. केतन डी. पोटे आणि ॲड. व्ही. आर. धोर्डे तर राज्य शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील डि. आर. काळे काम पाहत आहेत .