शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात तीन दिवसांत १५ कोरोना रुग्ण, संशयितांच्या चाचण्या सुरु

By मुजीब देवणीकर | Updated: March 15, 2023 13:12 IST

सध्या शहरात कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या एच-३ एन-२ संसर्गाचेही रुग्ण शहरात आढळून येत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : एच-३ एन-२ या काेरोनासदृश विषाणूने धुमाकूळ घातलेला असतानाच शहरात तीन दिवसांमध्ये तब्बल १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली असून, उन्हाळ्यापूर्वी कोरोना उद्रेकाची ही चिन्हे तर नाहीत ना, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे. मागील तीन वर्षांचा अनुभव पाहता मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातच कोरोनाची साथ अधिक तीव्र होती.

सध्या शहरात कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या एच-३ एन-२ संसर्गाचेही रुग्ण शहरात आढळून येत आहेत. महापालिकेने प्रत्येक आरोग्य केंद्रावर आरटीपीसीआर व अँटिजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिली. दररोज संशयित रुग्णांची टेस्ट करण्यात येत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. मागील दोन-तीन दिवसांत केलेल्या अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्टमधून १५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यातील दोन केसेस या ग्रामीण भागातील असून १३ जण शहराच्या विविध भागांतील आहेत.

मेल्ट्रॉन रुग्णालय सज्जसंसर्गवाढीचा धोका लक्षात घेत मेल्ट्रॉन रुग्णालयातील उपचार सुविधा सज्ज ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र टीम कामाला लावली जाणार आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

कोरोना, एच-३ एन-२ ची लक्षणेकोरोना, एच-३ एन-२ आणि स्वाइन फ्ल्यू या तिन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी कोरोना टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.

घाटीत तपासणीबाधितांसाठी एकच आरटीपीसीआर टेस्ट आहे. या टेस्टद्वारे घाटीतील लॅबमध्ये कोरोना, एच-३ एन-२ आणि स्वाइन फ्ल्यू या आजारांची एकाच वेळी टेस्ट केली जात असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद