शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य उपकेंद्र बंद; गरीब महिलेची रस्त्यावरच प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:21 IST

आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने गावोगाव फिरून पोटाची खळगी भरण्यासाठी ‘डोंबारी’चे खेळ करणाºया एका महिलेवर रस्त्यावरच प्रसूत होण्याची वेळ आली.

लोकमत न्यूज नेटवर्कलाडसावंगी : आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने गावोगाव फिरून पोटाची खळगी भरण्यासाठी ‘डोंबारी’चे खेळ करणाºया एका महिलेवर रस्त्यावरच प्रसूत होण्याची वेळ आली. सुदैवाने आशा कार्यकर्ती मदतीला आल्याने तिने बाळंतपण सुखरूप करून दिले. ही संतापजनक घटना औरंगाबाद तालुक्यातील हातमाळी गावात मंगळवारी घडली.दोरीवरचे खेळ दाखविणारे डोंबारी कुटुंब हातमाळी गावात आलेले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता या कुटुंबातील रेखा जितेंद्र वाघ यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. जवळच्या हातमाळी आरोग्य उपकेंद्रातही नेहमीप्रमाणे कुणीच नव्हते. त्यामुळे प्रसूतीसाठी जावे कोठे, असा प्रश्न या कुटुंबाला पडला. जवळ पैसा नसल्याने मोठ्या दवाखान्यात जाण्याची त्यांची हिंमत होईना. मंगळवार उजाडला तरीही त्रास होऊ लागल्याने रेखाबाईची सासू ताराबाई वाघ पुन्हा या आरोग्य उपकेंद्रात गेल्या, तेव्हाही हे केंद्र बंद असल्यामुळे गावातील काही महिलांनी त्यांना आशा कार्यकर्ती प्रभावती पडूळ यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. ताराबाई त्यांच्याकडे गेल्या. प्रभावती पडूळ यांनी वेळ न घालवता आपला आशा आरोग्य संच घेऊन झोपडीतच आहे त्या परिस्थितीत बाळंतपण केले. सुदैवाने रेखाबाईची प्रसूती सुखरूप झाली आणि तिने बाळाला जन्म दिला. प्रसूती सुखरूप करून दिली म्हणून डोंबारी कुटुंबाने आशा कार्यकर्ती व गावकºयांचे आभार मानले व आरोग्य विभागाबाबत नाराजी व्यक्त केली. हातमाळी उपकेंद्र हे लाडसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राशी जुडलेले असल्याने याविषयी वैद्यकीय आधिकारी डॉ. राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या आरोग्यसेविकेविषयी अनेक तक्रारी असून, तसे वरिष्ठांना कळविले आहे, तरीही कार्यवाही झाली नाही. वरिष्ठांनी दखल घेऊन आरोग्यसेविकेवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.आरोग्य उपकेंद्रकेवळ नावालाचहातमाळी उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याने हे केंद्र केवळ नावापुरतेच उरले आहे.४शिवाय या गावातील आरोग्यसेविका महिन्यातून एकच दिवस लसीकरण सत्रासाठी गावात येते.४हातमाळी उपकेंद्रात राहण्याची सगळी व्यवस्था असतानासुद्धा आरोग्यसेविका गावात राहत नाही, अशी माहिती गावातील लोकांनी दिली.