शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात शेतीतील मातीचे आरोग्य बिघडतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 20:34 IST

शेतीचा डॉक्टर :  मातीचा पोत खालावल्याचे तपासणीतून सिद्ध झाले.

- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद)

निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायामाची आवश्यकता आहे. तसेच भरघोस आणि दर्जेदार पिकांच्या उत्पादनासाठी माती सुपीक असणे आवश्यक आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात नेमके उलटे घडत आहे. येथील शेतीतील मातीचे आरोग्य खालावल्याचे समोर आले आहे. रासायनिक खतांचा चुकीच्या पद्धतीने वापर व एकच पीक वारंवार घेण्याच्या प्रवृत्तीमुळे हा परिणाम झाला आहे. 

औरंगाबाद कृषी विभागाच्या मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभागात एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान जिल्हाभरातून आलेले मातीचे ६१ हजार ९९५ नमुने तपासण्यात आले. यात मातीतील आम्लविम्ल निर्देशांक (सामू), क्षारता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, जस्त, बोरॉन, लोह, मँगनीज व तांबे या १२ घटकांची तपासणी करण्यात आली. पीक वाढीसाठी चांगल्या जमिनीत ०.८० च्या वर सेंद्रिय कर्बचे प्रमाण आवश्यक आहे. यात कन्नड व औरंगाबाद तालुक्यातील काही गावांत ०.९० ते १ पेक्षा अधिक सेंद्रिय कर्बचे प्रमाण आढळून आले. तर वैजापूर व गंगापूरमध्ये सेंद्रिय कर्बचे प्रमाण ०.४० ते ०.६० आहे. शिवाय क्षारतेचे प्रमाण या दोन तालुक्यात जास्त आढळून आले. त्यामुळे येथील मातीचा पोत अन्य तालुक्यांपेक्षा जास्त खालावल्याचे तपासणीतून सिद्ध झाले.

सेंद्रिय खताचा वापर होतो तेथील मातीचा पोत सुधारत आहे.  साधारण ७.५० ते ८.२० दरम्यान क्षाराचे प्रमाण हवे असते. ते वाढले आहे. सेंद्रिय कर्ब कमी असल्याने नत्रचे प्रमाण कमी आहे. जमिनीचा पोत वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती करणे आवश्यक आहे.  रासायनिक खतांचा अति व चुकीचा वापर टाळणे. तसेच सुपीक जमिनीसाठी गांडूळ खत, कंपोस्ट खत, जैविक खते आदी सेंद्रिय घटकांच्या वापरातून सेंद्रिय कर्ब वाढविणे आवश्यक आहे. एकच पीक वारंवार घेणे टाळायला हवे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी