शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे जिल्हा राज्यात अव्वल

By admin | Updated: March 24, 2016 00:42 IST

उस्मानाबाद : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आरोग्य विभाग वेगवेगळ्या उपक्रमामध्ये अव्वल आल्याचे सांगत दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून

उस्मानाबाद : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आरोग्य विभाग वेगवेगळ्या उपक्रमामध्ये अव्वल आल्याचे सांगत दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून आरोग्य यंत्रणेने तळागळातील लोकांपर्यंत सेवा पुरवावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांनी केले. डॉ. आनंदीबाई गौरव पुरस्कार विजेते आणि गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने बुधवारी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड, सभापती दत्ता मोहिते, हरिष डावरे, लता पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगाकवर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. के. नवले, सदस्य रामदास कोळगे, स्मिता ननवरे, सुशिला कठारे, शामल वडणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरवर करण्यात आला. अध्यक्ष अ‍ॅड. पाटील म्हणाले, दोन-अडीच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा पुरता बोजावारा उडला होता. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे जाणाऱ्या रूग्णांची संख्या रोडावली होती. अनेक केंद्रातील शस्त्रक्रियागृह बंद असल्याने प्रसुतींची संख्याही घटली होती. मात्र कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत ढेपाळलेली आरोग्य सेवा गतिमान करण्यात यश आले. एवढेच नाही, तर जिल्हा अनेक उपक्रमामध्ये राज्यात अव्वल आला आहे. ही बाब उस्मानाबादकरांच्या दृष्टीकोनातून अभिमानाची असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठीही आरोग्य विभागाकडून चांगले काम सुरू असल्याचे ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी रायते म्हणाले की, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेवून आरोग्य यंत्रणेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले आहे. त्यामुळेच आरोग्य केंद्रातून उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यावेळी उपाध्यक्ष सुधाकर गुंड म्हणाले की, पूर्वी ज्या आरोग्य केंद्रा वर्षाला आठ ते दहा प्रसुती होत असत. तेथे आज महिन्याला २० ते २२ प्रसती होवू लागल्या आहेत. आरोग्य विभागाने हीच गती कायम ठेवत राज्यात नावलौकिक निर्माण करावा, असे आवाहन केले. प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी प्रास्ताविक केले. मी एकटा अधिकारी काहीही करू शकत नाही. परंतु, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी वेळोवेळी भक्कम साथ दिली. त्यामुळेच आरोग्य विभागाच्या नावलौकिकाचे सर्व श्रेय हे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना जाते, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी) डॉ. आर. एस. खराडे, डॉ. एम. जी. पोतरे, डॉ. जी. बी. मुधोळकर, डॉ. एस. बी. यत्नाळकर, डॉ. वागतकर, एस. आर. सागर, ए. ए. राठोड, पी. टी. गंगावणे, एन. एन. बिराजदार, एन. बी. भिंगडे, के. व्ही. लोहार, एस. व्ही. कदम, आर. ए. महाजन, यु. व्ही. कुलकर्णी, एस. आर. चव्हाण, व्ही. सी. सूर्यवंशी, एस. एन. थोरात, एस. सी. लकडे, एस. एन. शिंदे, एम. डी. पाटील, पी. एम. शिंदे, एस. जी. भानवसे, सी. जे. कांबळे, नितीन काशिनाथ स्वामी, कालिंदा धनंजय कदम, मंगल प्रताप वाडीकर, सुकुमार संजय शिरगिरे, बबीता रामेश्वर कोळी, वर्षा शहाजी रितापुरे, अनिता मोहन माळी, महादेव गोपाळ माने, संजीवनी किसनसिंग राजपूत, मनिषा संतोष मेहेर, मुक्ता पद्मराज भडके, लक्ष्मी सदानंद कांबळे, अरूणा सतीश लोहार, जयमाला ठोसर, मालन शिखरे, सविता लोढे, निता शिंदे, रेषा सुरवसे, मिनाक्षी कानडे, आशा गाडे, आशा गावडे, श्रीदेवी चौरे, राणी इंगळे, प्रमिला पवार आदींचा समावेश आहे.