शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

जिल्ह्यात आरोग्य केंद्रेच ‘आजारी’..!

By admin | Updated: December 11, 2014 00:43 IST

संजय तिपाले, बीड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळाची ‘डोकेदुखी’ समस्या निर्माण झालेली असतानाच असुविधेचा ‘तापा’ ने डोके वर काढले आहे़

संजय तिपाले, बीडजिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळाची ‘डोकेदुखी’ समस्या निर्माण झालेली असतानाच असुविधेचा ‘तापा’ ने डोके वर काढले आहे़ ३४ ठिकाणच्या केंद्रांमध्ये दुरुस्तीकामे वर्षानुवर्षे रखडलेलीच आहेत़ रुग्णांचे आजार दूर करण्यासाठी बांधलेल्या केंद्रांनाच विविध समस्यांच्या ‘आजारां’नी घेरले ेआहे़ त्यामुळे रखडलेल्या दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे़जिल्ह्यात ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे असून त्यामार्फत ग्रामीण भागातील रहिवाशांच्या आरोग्याची देखभाल घेतली जाते़ स्त्री जन्माचा घसरलेला टक्का, माता व बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याने बीडचा समावेश ‘हायफोकस’मध्ये केलेला आहे़ मात्र, ‘हायफोकस’मधील जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा कोलमडलेलीच आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३९ तर आरोग्यसेवकांची ७० पदे रिक्त आहेत़ तोकड्या मनुष्यबळावर कारभार सुरु असतानाच आता नवीच समस्या ‘आ’ वासून उभी आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असून त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे़ शिवाय काही ठिकाणी आरोग्य केंद्रांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. काही केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांमध्ये असुविधा आहेत. या सर्व कामांची दुरुस्ती रखडलेली आहे.आराखडा तयारजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार केलेला आहे. एकूण ४ लाख ५२ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्रांत केवळ किरकोळ दुरुस्त्या करणे गरजेचे आहे. सध्या आरोग्य विभागाकडे निधी शिल्लक नाही. त्यामुळे सीईओंमार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आयुक्तांसह संचालकांना निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे. निधी येताच कामे पूर्ण केले जातील,असेही ते म्हणाले.वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे आहे. मात्र, बहुतांश अधिकारी मुख्यालयी न थांबता ‘अप- डाऊ न’ करतात. मुख्यालयी बांधलेल्या निवास्थस्थानांमधील असुविधेचा मुद्दा तर वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ‘कळी’चाच ठरला आहे. असुविधा असल्याचे सांगून अनेक अधिकारी मुख्यालयी राहण्याचे टाळत असल्याचे पहावयास मिळत आहे.