नांदेड : तरोडा बु़ येथील त्रिमूर्तीनगर भागात झालेल्या घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वीच पकडले होते़ त्यात फरार असलेल्या आणखी एकाला पकडून त्याच्याकडून १ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत़ चोरट्याकडून सोने विकत घेणाऱ्या सराफा व्यापाऱ्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ रमेश राऊत यांच्या घरी दिवसा घरफोडी करुन चोरट्यांनी सव्वापाच लाखांचा ऐवज जप्त केला होता़ या प्रकरणात आंबेडकरनगर येथील अजिंक्य राजू बेंद्रे याला पोलिसांनी चौकशीसाठी उचलल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला़ यामध्ये एक बालगुन्हेगार व महेंद्र विजय शिवभगत यांचाही सहभाग असल्याचे उघडकीस आले़ परंतु महेंद्र शिवभगत हा चोरीच्या घटनेतील वाटणीनंतर परराज्यात गेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती़ त्याच्या शोधासाठी पथकही रवाना करण्यात आले होते़ ९ जून रोजी पथकाने महेंद्र शिवभगतच्या मुसक्या आवळल्या़ यावेळी त्याने वाट्याला आलेल्या सहा तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या इतवारा सराफा लाईनमधील सोनार सय्यद मोसीन सय्यद महेबुब याच्याकडे विकल्याचे कबूल केले़ त्यानंतर पोलिसांनी सय्यद मोसीन याच्याकडून १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले़ याप्रकरणी सय्यद मोसीन याच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपासासाठी त्यांना भाग्यनगर ठाण्याच्या ताब्यात दिले़ कारवाईत सहा. पोनि शिवाजी अण्णा डोईफोडे, पोउपनि अनिल आदोडे, उत्तम वरपडे, ज्ञानेश्वर तिडके, पुंडलिक घुम्मलवाड, सुभाष आलोने, राजकिरण सोनकांबळे, गजानन राऊत, बालाजी कोंडावार, बालाप्रसाद जाधव, सपोउपनि कुलकर्णी यांचा समावेश होता़ (प्रतिनिधी)
म्होरक्याच्याही मुसक्या आवळल्या
By admin | Updated: June 11, 2014 00:24 IST