शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीशी बोलण्याच्या वादातून मित्राला गाडीखाली चिरडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 20:40 IST

मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर रागाच्या भरात मोपेडस्वार मित्राला चिरडून ठार केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी साडेतीन ते पावणे चार वाजेच्या सुमारास  सिडको एन-२ येथील जिजाऊ चौकात घडली.

औरंगाबाद : मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर रागाच्या भरात मोपेडस्वार मित्राला चिरडून ठार केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी साडेतीन ते पावणे चार वाजेच्या सुमारास  सिडको एन-२ येथील जिजाऊ चौकात घडली. या घटनेत इतर दोन तरुण जखमी झाले.संकेत संजय कुलकर्णी (२०,रा.पुणे, मूळ रा.पाथरी,जि.परभणी)असे मृत तरुणाचे नाव आहे. तर जखमींमध्ये शुभम संजय डंक(१७,रा. उस्मानपुरा, एम्पायर वसतिगृह) आणि विजय कडुबा वाघ(२०,रा.जयभवानीनगर गल्ली नंबर १) यांचा समावेश आहे. तर संकेत प्रल्हाद जायभाये (२२,रा. जयभवानीनगर, गल्ली नंबर ११)असे कारचालक आरोपीचे नाव आहे. 

अंगावर काटा आणणार्‍या या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, मृत संकेत कुलकर्णी,जखमी विजय, शुभम आणि आरोपी संकेत हे चांगले मित्र आहेत. मृत संकेत पूर्वी औरंगाबादेत राहत होता. तो त्याच्या मैत्रिणीसोबत सतत बोलत असतो. त्या मुलीवर आरोपी संकेतचे एकतर्फी प्रेम असून संकेतने तिच्याशी बोलू नये, असे आरोपीने त्याला अनेकदा सांगितले होते. त्यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाला. याच दरम्यान संकेत  औरंगाबादेत मित्रांना भेटण्यासाठी आला. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संकेत आणि त्याचे मित्र हे एका मोपेडने एन-२ सिडक ोतील कामगार चौकाकडून महालक्ष्मीचौकाकडे जात होते. चौकाजवळ कार (एमएच-१६एजे १५८५) घेऊन आलेल्या आरोपी संकेत जायभाये  आणि संकेत कुलकर्णीमध्ये कुरबुर झाली. त्यानंतर  संकेत, शुभम आणि विजय हे मोपेडने ट्रिपलसीट पुढे निघाले. ते शंभर मिटर पुढे असताना आरोपीने वेगात येऊन मित्रांच्या मोपेडला  जोराची धडक दिली. यात तिघेही रस्त्यावर फेकले गेले. यानंतर आरोपीने त्याची कार वळवून त्यांच्या दिशेने वेगात आणली. आरोपी कार घेऊन वेगात येत असल्याचे पाहून विजय आणि शुभम बाजुला पळाले, यावेळी आरोपीने त्याची कार  संकेतच्या अंगावर घातली यातच संकेतचा अंत झाला. यांनतर आरोपी फरार झाला असून मुकुंदवाडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.