शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

तीन शेळ्यांना फस्त करून बिबट्या जमावावर धावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:29 IST

कायगाव परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणा-या बिबट्याने आता धनगरपट्टी शिवारात प्रवेश केला आहे. सोमवारी भर दुपारी वीसपेक्षा जास्त नागरिकांच्या जमावावर दोनदा धावून येण्याचा प्रयत्न या बिबट्याने केला. मात्र लोकांनी समयसूचकता दाखवल्याने सुदैवाने काही दुर्घटना घडली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककायगाव : कायगाव परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणा-या बिबट्याने आता धनगरपट्टी शिवारात प्रवेश केला आहे. सोमवारी भर दुपारी वीसपेक्षा जास्त नागरिकांच्या जमावावर दोनदा धावून येण्याचा प्रयत्न या बिबट्याने केला. मात्र लोकांनी समयसूचकता दाखवल्याने सुदैवाने काही दुर्घटना घडली नाही. मात्र त्यानंतर रात्री बिबट्याने ३ शेळ्यांचा फडशा पाडल्याने नागरिकांत प्रचंड घबराट पसरली आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे.मागील तीन महिन्यांपासून कायगाव परिसरातील जुने कायगाव, अंमळनेर वस्ती, जुने लखमापूर, जुनी गणेशवाडी, अंतापूर शिवार, सैदापूर शिवार, अहिल्याबाई बारव शिवार, भेंडाळा शिवार आदी भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. विविध ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार केले. यामुळे शेतवस्त्यावर राहणा-या नागरिकांत दहशत पसरली आहे. वनविभागाने अंमळनेर वस्तीनजीक एक पिंजरा लावला आहे. दुसरा पिंजरा जामगाव शिवारात बसविण्यात आला आहे. मात्र बिबट्या अजूनही मोकाट आहे. दिवसाआड प्राण्यांवर हल्ले होत असताना वनविभागाने मात्र आता गुडघे टेकले आहेत. नागरिकांत भीतीचे वातावरण असले तरी वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पुरेसे प्रयत्न करताना दिसत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पिंजºयात सावज नसणे, शेतकºयांनी अनेकदा फोन करूनही घटनास्थळी न येणे, आदी प्रकाराने नागरिकांत संताप पसरला आहे.धनगरपट्टीजवळ सोमवारी दुपारी चार वाजेदरम्यान कडूबाळ म्हसरूप यांना बिबट्या दिसला. त्यांनी ताबडतोब जवळपासच्या शेतकºयांना याबाबत माहिती दिली. काहीच वेळात सुमारे वीस ते पंचवीस शेतकरी तेथे जमले. शेतकरी जमल्याने बिबट्या बिथरला. त्याने दोन वेळा शेतकºयांचा अंगावर धावून येण्याच्या प्रयत्न केला. शेतकºयांनी घाबरून तेथून धूम ठोकली. त्यानंतर बिबट्याही जवळच्या उसाच्या शेतात लपला. या घटनेनंतर संपूर्ण रात्र धनगरपट्टीतील नागरीकांनी जागून काढली. मात्र धनगरपट्टीजवळील एका शेतवस्तीवर जब्बार अब्बास शेख यांच्या शेतात सोमवारी रात्री पुन्हा बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. यावेळी त्याने तीन शेळ्यांचा फडशा पाडला. शेतवस्तीवर रात्री कुणीही नव्हते त्यामुळे मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.