शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
3
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
4
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
5
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
6
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
7
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
8
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
9
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
10
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
11
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
12
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
13
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
14
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
15
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
16
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
17
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
18
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

घातक रसायन नदीत सोडणारे रॅकेट जाळ्यात

By admin | Updated: March 1, 2015 00:10 IST

वाळूज महानगर : घातक रसायनयुक्त सांडपाण्याचे टँकर खाम नदीच्या पात्रात सोडणाऱ्या रॅकेटचा आज पहाटे एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पर्दाफाश केला असून,

वाळूज महानगर : घातक रसायनयुक्त सांडपाण्याचे टँकर खाम नदीच्या पात्रात सोडणाऱ्या रॅकेटचा आज पहाटे एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पर्दाफाश केला असून, सात टँकरसह पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये भाजपचे नगरसेवक आगा खान व मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांचा सहभाग असल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.शनिवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसी पोलिसांची गस्त सुरू असताना खबऱ्याने घातक रसायनाने भरलेले टँकर खाम नदीत सोडले जात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे, फौजदार अजय पांडे, फौजदार रेश्मा सौदागर, रमेश सांगळे, परमेश्वर पायगव्हाणे, एस. एम. रोकडे, बाळासाहेब आंधळे, सुनील म्हस्के, संदीप बीडकर, योगेश कुलकर्णी, सय्यद शकील, अनिल कदम आदींच्या पथकाने नगर रोडवर नगरसेवक आगा खान मिया खान यांच्या नगर रोडवरील गुजरात फ्राईट ट्रान्सपोर्ट याठिकाणी छापा मारला. या ट्रान्सपोर्टच्या आवारात टँकर (क्रमांक एमएच-०५ एएम-७७९९) मधून पाईपच्या साह्याने संरक्षक भिंतीमधून रसायनयुक्त सांडपाणी खाम नदीपात्रात सोडले जात असल्याचे दिसून आले. घटनास्थळी सात रसायनयुक्त टँकर दिसले. यातील दोन टँकरचे पाणी खाम नदीत सोडण्यात आले असून, तिसरा टँकर खाली करताना पोलिसांनी कारवाई केली.घटनास्थळी असलेल्या आगा खान (३३, रा. कैलासनगर, औरंगाबाद), सुमित श्याम खांबेकर (३३, रा. दलालवाडी) यांच्यासह चंदन नागेंद्रसिंग (२३, रा. रांजणगाव शे.), तुषार तुकाराम पाखरे (२८, रा. गीतानगर, हडको) व अस्लम कलीम शेख (३२, रा.पाथरीकरनगर, औरंगाबाद) या पाच आरोपींना अटक करून गुन्हा नोंदविण्यात आला.