शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

हतबल शिवसेनेने ‘समांतर’चे नाव बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:01 IST

शहराच्या पाणी प्रश्नावर दर पाच वर्षांनंतर महापालिकेची सत्ता काबीज करणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने मंगळवारी आणखी एक चमत्कार केला. समांतर जलवाहिनी योजनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी चक्क नाव बदलले.

ठळक मुद्देयोजना अधांतरी : १० वर्षांत एक लिटर पाणी आणले नाही

औरंगाबाद : शहराच्या पाणी प्रश्नावर दर पाच वर्षांनंतर महापालिकेची सत्ता काबीज करणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने मंगळवारी आणखी एक चमत्कार केला. समांतर जलवाहिनी योजनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी चक्क नाव बदलले. ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे गोंडस नाव देण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. योजनाच पूर्ण झालेली नसताना नाव कशासाठी बदलण्यात आले, असा आक्षेप एमआयएमने नोंदविला.देशभरात मोठ्या शहरांची नावे बदलण्याचा ट्रेंड सुरू आहे. या राजकारणात भाजपने बरीच आघाडी घेतली आहे. महापालिकेतील शिवसेनेनेही यात उडी घेतली. शहराचे नाव बदलण्यात सेनेला यापूर्वीच अपयश आलेले आहे. आता सेनेने शहराची तहान भागविण्यासाठी उभारण्यात येणाºया जलवाहिनी प्रकल्पाचे नाव बदलले आहे. महापालिका वर्धापन दिनानिमत्त आयोजित पत्रकार परिषदेत महापौरांनी नमूद केले की, समांतर म्हटले तर नागरिकांच्या डोळ्यासमोर एक कंपनी येते. म्हणून आम्ही ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे नवीन नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. समांतर म्हणजे पर्यायी असा अर्थ होतो. या प्रकल्पाला समांतर असे नाव कधीच दिलेले नव्हते. ते आपोआप पडले होते. आता आपण त्यास नाव दिले आहे.दहा वर्षांपासून निधी पडूनजायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत २००० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकून शहरात पाणी आणण्यास केंद्र आणि राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी महापालिकेला १६१ कोटी २० लाख रुपये दिले. या निधीवर मनपाने आजपर्यंत १२७ कोटी ९ लाख रुपये व्याज जमा केले आहे. मागील दहा वर्षांपासून शिवसेना-भाजप युती महापालिका निवडणुकांमध्ये समांतरच्या मुद्यावर निव्वळ आश्वासने देत आली आहे. भोळी जनताही युतीच्या शब्दावर विश्वास ठेवत आली आहे. मागील दहा वर्षांमध्ये युतीने एक थेंबही शहरात पाणी आणले नाही.पाणीपुरवठ्याचे खाजगीकरणसमांतर जलवाहिनी नावावर युतीने शहराच्या पाणीपुरवठ्याचे चक्क खाजगीकरण करून टाकले होते. खाजगी कंपनी नागरिकांच्या खिशावर अक्षरश: दरोडे टाकत असल्याचे लक्षात येताच तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी २०१६ मध्ये कंपनीची हकालपट्टी केली. आता परत याच कंपनीला काम देण्यासाठी युतीचे नेते रेड कार्पेट अंथरूण बसले आहेत. कंपनीने मनपावर एवढ्या अटी-शर्ती टाकल्या आहेत की, मनपा त्या अटी कधीच मान्य करू शकत नाही.पाणी कधी येणार?समांतर जलवाहिनीच्या माध्यमाने शहरात पाणी कधी येईल, हे युतीचे नेते ठामपणे सांगू शकत नाहीत. योजनाच सध्या अधांतरी असताना योजनेचे नाव बदलण्याचे धाडस मंगळवारी करण्यात आले. महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने याला कडाडून विरोध दर्शविला. योजना तर पूर्ण होऊ द्या, असा सल्लाही विरोधी पक्षाने दिला. बाळ जन्माला येण्यापूर्वीच घाई कशासाठी, असा टोलाही विरोधी पक्षनेत्यांनी दिला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater transportजलवाहतूक