शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नाट्यगृहात ‘वेदनेचा हुंकार’

By admin | Updated: September 8, 2015 00:38 IST

औरंगाबाद : वेदना म्हणजे काय असते... ही वेदना सार्वत्रिक झाल्यावर तिच्या पसरणाऱ्या गडद छायेतून कुणालाही पळता येत नाही...

औरंगाबाद : वेदना म्हणजे काय असते... ही वेदना सार्वत्रिक झाल्यावर तिच्या पसरणाऱ्या गडद छायेतून कुणालाही पळता येत नाही... पर्वताएवढ्या वेदनेचे हे हुंकार सिडको नाट्यगृहाने सोमवारी व्याकूळतेने पाहिले, सोसले. त्या तास दोन तासांची घडी सर्वांनाच असह्य झाली होती.कार्यक्रम तसा मदतीचा हात देणारा. मग इतर दानशूरांच्या समारंभातून झळकणारे दातृत्व येथेही किंचित का होईना मिरविले जाईलच, अशी बहुतेकांची अपेक्षा येथे फोल ठरली. सभागृहात पाऊल ठेवताच, तेथील स्मशानशांतता अगोदरच अंगावर धावून येत होती. मग सभागृहात नजर फिरली की, पोटात कालवाकालव झाल्याशिवाय राहत नव्हती. मंचासमोरील सभागृहातील अर्ध्याअधिक खुर्च्यांवर त्या अभागी महिला सुतकी चेहऱ्यांनी बसून होत्या. त्यांचे उघडे-बोडखे कपाळ, त्यांच्यावरील आपबिती सांगत होते. हा मेळावा विधवांचा खचितच नव्हता; परंतु त्याला स्वरूप मात्र तसेच आले होते. सभागृहात नजर फिरवली की आसवे गाळणारे डोळे अन् कड्याखांद्यावर ओरडणारं लेकरू दिसत होतं. अगदी नवागत वधूंना अकाली आलेले वैधव्य आणि उतारवयातही तेच दु:ख सोसणाऱ्या ज्येष्ठ महिला. डोळ्यांच्या कडा पाणावलेले काही तुरळक बापे आणि तरुणही. बहुतांश महिलांचा पती गेलाय, तर काहींना वडील, भावाने आत्महत्या केल्याचे दु:ख आहे. संपूर्ण कार्यक्रमावर दु:खाची छटा होती. मंच साधा होता. ना दीप प्रज्वलन. ना प्रतिमापूजन. फुले , हारतुरे टाळले होते. दु:खी जिवांना दिलासा देताना, कुठेही आत्मस्तुती होणार नाही, याचेही भान राखण्यात आले होते. मदतीचे धनादेशही संबंधितांना त्यांच्या जागेवरच पोहोचते केले जात होते. टाळ््या, शिट्या नको, हे आवाहन अगोदरच करण्यात आले होते. नाना पाटेकर हे तसे समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व. त्यांनीही या दु:खी मनावर हळूच मायेची फुंकर मारली. ही मदत नाही. हा दिलासा आहे. तो देखील स्वत:ला. आम्ही हे केले नसते तर समोरचे दु:खी चेहरे पाहून आपण वेडेच झालो असतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हसऱ्या चेहऱ्याच्या मकरंद अनासपुरेच्या चेहऱ्यावरील स्मितही लपले होते. आभाळ आटलयं. दु:ख मोठं आहे. आपण आपली माणुसकी शाबुत ठेवूया, असे म्हणत, त्याने ‘माणसाने माणसासाठी चालवलेली माणुसकीची ही चळवळ’ अशी त्याची चपखल व्याख्याही करून टाकली. सभागृहात एक तळमळ होती. विधायक जाणिवा उपस्थितांच्या हृदयाला हात घालत होत्या.अप्रूपाबाई खैरनार या महिलेला प्रत्येकी १५ हजार रुपयांचे दोन धनादेश देण्यात आले. याचे कारण जाणून घेतले, तेव्हा असे समजले की, अप्रूपाबाईच्या पती व मुलानेही कर्जापायी आत्महत्या केली. हे धनादेश स्वीकारण्यासाठी आलेल्या अप्रूपाबाईच्या देहबोलीने दु:खाची दाहकता अनेकांना जाणवली. सध्या सप्टेंबरात पाण्याचे हे हाल आहेत. जानेवारीत काय होणार, असा प्रश्न यावेळेस पाटेकर, अनासपुरेद्वयींनी उपस्थित करून भविष्यातील आपले वर्तन सुधारण्याची विनंती केली. पैसे देणारे खूप आहेत. ते देतीलही; परंतु पाणी तर विकत घेता येणार नाही, मग काय करणार असा प्रश्न उपस्थित करून अनासपुरे म्हणाले, पाणी वापराचा ‘अवरनेस’शहरी मंडळींना आला पाहिजे. सर्वात जास्त पाण्याचा गैरवापर शहरात होतो. भविष्यात ही चैन परवडणारी नाही. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदतीचे वाटप होत असतानाच एक मध्यमवयीन व्यक्ती थेट धावत मंचावर पोहोचली. हातातील कागद नाना व मकरंदच्या समोर टाकून, शेतकऱ्यांना मदत व आम्हा मोलमजुरी करणाऱ्यांना काहीच कसं नाही, म्हणत टाहो फोडला. मागील तीन वर्षांपासून माझी पत्नी आजारी आहे.वडील मंदिरासमोर भीक मागतात, मला उपचारासाठी मदत करा, असे तो आक्रंदन करीत होता. त्याचे वृद्ध वडीलही त्याच्यापाठोपाठ याचना करीत मंचावर दाखल झाले. तेव्हा नाना व मकरंदने त्यांना शांत केले.