शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’त जाण्याची कटकट थांबणार; घरातूनच लर्निंग लायसन्स काढता येणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 17:33 IST

लर्निंग, पर्मनंट लायसन असो की वाहनांसंबंधी अन्य कामे, ती करण्यासाठी वाहनचालकांना शासकीय शुल्कापेक्षाच्या दुप्पट रक्कम एजंटांना द्यावी लागते.

ठळक मुद्देनव्या वाहनाच्या नोंदणीसाठी निरीक्षकांकडून तपासणीही होणार बंद, वितरकांकडूनच होईल नोंदणी

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : वयाची १८ वर्षे पूर्ण झाली की, प्रत्येक जण वाहन चालविण्याचे लायसन काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात जातो. वाहनचालकांना आधी लर्निंग लायसन काढावे लागते. त्यासाठी अर्ज करा, मग आरटीओ कार्यालयात जाऊन संगणकीय चाचणी द्यावी लागते. पण आता लर्निंग लायसनसाठी आरटीओ कार्यालयात जाऊन चाचणी देण्याच्या कटकटीपासून शिकाऊ वाहनचालकांची लवकरच सुटका होणार आहे. अगदी घरी बसून लर्निंग लायसन्स काढता येणार आहे.

आरटीओ कार्यालयात एजंटांशिवाय कामे होतच नाहीत, हा गेल्या अनेक वर्षांचा नागरिकांचा अनुभव आहे. लर्निंग, पर्मनंट लायसन असो की वाहनांसंबंधी अन्य कामे, ती करण्यासाठी वाहनचालकांना शासकीय शुल्कापेक्षाच्या दुप्पट रक्कम एजंटांना द्यावी लागते. परंतु गेेल्या काही वर्षांत संगणकीय प्रणालीमुळे वाहनचालकांना दिलासा मिळत आहे. आतापर्यंत स्पेशल परमिट काढणे, तात्पुरता वाहन परवाना घेणे, वाहनांचा कर भरणे ही कामे ऑनलाइन उपलब्ध झाली आहेत. त्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज उरली नाही. याच आता पुढे लर्निंग लायसन आरटीओ कार्यालयात न जाताही मिळणार आहे. ३० जूनपर्यंत ही सुविधा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शिकाऊ वाहनचालकांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

ऑनलाइन अर्ज अन् चाचणीसध्या लायसन्ससाठी ज्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा लागतो, अपाॅइंटमेंट घ्यावी लागते, त्या संकेतस्थळावर लर्निंग लायसनसाठी अर्ज करून चाचणी देता येईल. उमेदवारांना संकेतस्थळावर आधार क्रमांक नोंद करावा लागेल. नाव, पत्ता व स्वाक्षरी ही माहिती आधार डेटाबेसमधून परिवहन विभागाला मिळणार आहे. अर्जदाराला घरबसल्या शिकाऊ वाहन परवाना चाचणी देता येईल. यामध्ये विचारलेल्या ६० टक्के अचूक उत्तर दिल्यास शिकाऊ लायसन्सची चाचणी उत्तीर्ण झाल्याचे गृहीत धरून शिकाऊ वाहन परवान्याची प्रिंट मिळणार आहे. याविषयी आरटीओ कार्यालयास पुढील आठवड्यात अधिक माहिती प्राप्त होण्याची शक्यता आहे.

...तर जावे लागेल आरटीओ कार्यालयातज्यांच्याकडे आधार नाही किंवा ऑनलाइन परीक्षा द्यायची नाही, अशांना आरटीओ कार्यालयात जाऊन परीक्षा देता येणार आहे. परंतु आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. लॅपटाॅप, संगणकही घराघरात आहे. त्यामुळे लर्निंग लायसन्स घरी बसून काढण्याचे प्रमाण निश्चितच वाढेल, अशीच शक्यता वर्तविली जात आहे.

नव्या वाहनाची नोंदणी वितरकाकडूनचनव्या वाहनाची विक्री केल्यानंतर त्या वाहनाची आरटीओ कार्यालयाचे निरीक्षक शोरूममध्ये जाऊन तपासणी करतात. त्यानंतरच आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंदणी होते. परंतु आता वाहनाच्या नोंदणीसाठी वाहन निरीक्षक शोरूममध्ये जाऊन तपासणी करण्याची गरज राहणार नाही. ही पद्धतही ३० जूनपर्यंत सुरू होण्याची शक्यता आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली.

बदल करणे सुरूलर्निंग लायसन्सची चाचणी ऑनलाइन देऊन वाहनचालकांना स्वत: प्रिंट काढता येईल. तसेच नव्या वाहनाच्या नोंदणीसाठी शोरूममध्ये निरीक्षकांना जाण्याची गरज राहणार नाही. यासाठी काही बदल करणे सुरू आहे. अद्याप अधिक सविस्तर माहिती आलेली नाही. परंतु पुढील आठवड्यात अथवा ३० जूनपर्यंत हे सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी आरटीओ कार्यालयाची अनेक कामे ऑनलाइन झालेली आहेत.- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीस