शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

हर्सूल, पडेगावचा प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 18:26 IST

शहरातील कचराकोंडीला एक वर्ष पूर्ण होत असताना महापालिकेला एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आलेला नाही. हर्सूल आणि पडेगाव येथील प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीला एक वर्ष पूर्ण होत असताना महापालिकेला एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आलेला नाही. हर्सूल आणि पडेगाव येथील प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की मनपा प्रशासनावर ओढावण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

शहरातील कचरा प्रश्न सुटावा या हेतूने राज्य शासनाने विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती नेमली आहे. या समितीने चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी, हर्सूल येथे प्रकल्प उभारण्यास परवानगी दिली. चार ठिकाणी केंद्र उभारण्यासाठी महापालिकेने २६ कोटींच्या शेडचे कंत्राट दिले. चारपैकी एकाच ठिकाणी म्हणजे चिकलठाण्यात शेड उभारणीस अजिबात अडथळा नाही. त्यामुळे युद्धपातळीवर काम सुरू आहे. उर्वरित तीन ठिकाणी शेड उभारणीचे नारळही फोडण्यात आलेले नाही. उलट पडेगाव, हर्सूल येथील प्रकल्प रद्द करण्याचे संकट घोंगावत आहे.पडेगाव येथे दोन वेगवेगळे वादपडेगाव येथील प्रकल्पाला परिसरातील नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी १० आॅक्टोबर रोजी मंत्रालयात बैठक घेऊन या प्रकल्पाला स्थगिती दिली. त्यामुळे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पडेगावचे काम थांबवले.

स्थगिती आदेश उठविण्यासाठी मनपाकडून आजपर्यंत सकारात्मक प्रयत्नच झाले नाहीत. यासोबतच ज्या कत्तलखान्याच्या परिसरात महापालिकेला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करायचा आहे, तेथे १५८ प्लॉटधारक आहेत. या प्लॉटधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना दिलासा मिळाला नाही. प्लॉटधारकांना पर्यायी जागा देण्याबाबत आयुक्तांनी अंतिम निर्णय घ्यावा, असे महापौरांनी शुक्रवारी सूचित केले. वाद संपुष्टात आणता येत नसतील तर प्रकल्प रद्द करून टाका म्हणत महापौरांनी संताप व्यक्त केला.

कंत्राटदाराने आणले मनपाला संकटातहर्सूल येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी मनपाने निविदा काढली. नागपूरच्या हायक्यूब या कंपनीने निविदा भरली. सर्वाधिक कमी दर असल्याने मनपाने निविदा अंतिम केली. आता चुकून निविदा कमी दराची भरली असे कंपनीचे म्हणणे आहे. दर वाढवून द्या तरच काम सुरू होईल, अशी भूमिका कंपनीची आहे. यावर मागील तीन महिन्यांत तरी महापालिकेला अंतिम निर्णय घेता आलेला नाही. एका टेबलावरून दुसºया टेबलावर निव्वळ कंत्राटाबाबतचा वाद फिरत आहे.

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबाद