शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हर्षवर्धन जाधवांनी पुकारले बंड

By admin | Updated: July 20, 2016 00:30 IST

कन्नड : कन्नड नगर परिषद निवडणुकीसाठीची पूर्वतयारी इतर राजकीय पक्षांनी सुरू केली असून, राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

कन्नड : कन्नड नगर परिषद निवडणुकीसाठीची पूर्वतयारी इतर राजकीय पक्षांनी सुरू केली असून, राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. दुसरीकडे शिवसेनेची साधी बैठकही नाही. उमेदवार मात्र शिवसेनेकडे अपेक्षेने पाहत आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी आपण विकासमहर्षी रायभान जाधव विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, या भूमिकेत तसूभरही बदल होणार नाही, असे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विकास आघाडीच्या स्थापनेबाबत भूमिका स्पष्ट करताना सांगितले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेच्या वेळी व नगरसेवकपदाच्या आरक्षणाच्या वेळी प्रचंड उदासीनता दाखविल्यामुळे त्यांचे आणि सध्या अस्तित्वात असलेल्या नगर परिषद पदाधिकाऱ्यांचे साटेलोटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक येईपर्यंत वेळकाढूपणा करायचा आणि नंतर चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटप करून पुन्हा काँग्रेस पक्षाचीच सत्ता नगर परिषदेत आणण्यासाठी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले तरी मला आश्चर्य वाटणार नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. शिवसेना पक्षाचा अधिकृत आमदार म्हणून पक्ष वाढीसाठी मनापासून प्रयत्न करताना राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे केली. शहरात एकीकडे नगर परिषद अस्वच्छ पिण्याचे पाणी पुरवीत असताना स्वखर्चाने तब्बल १५ टँकरने शहरास पाणीपुरवठा केला. हिवरखेडा रस्त्याचे कामही सुरू आहे. शहरासाठी विकासकामे मंजूर करून आणलीत. मात्र, त्यासाठी नगर परिषदेने ना हरकत प्रमाणपत्र दिले नव्हते. त्यामुळे ही विकासकामे आठ महिने लांबणीवर पडली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कानउघाडणी झाल्यावर काही कामास नाहरकत मिळाले. मात्र, माळीवाड्याचे नाहरकत दिले नाही. त्यामुळे सरकारी निधी थांबवून स्वखर्चाने पाण्याच्या मोटारी बसविल्या. बसस्थानकावर स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सोडविला. या कामांमुळे नगर परिषदेवर भगवा फडकविण्याबाबत जनभावना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.