शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

आक्रोशाने हादरले जिल्हा रूग्णालय

By admin | Updated: May 13, 2015 00:26 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील केशेगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यातील पाकाची टाकी साफ करताना अचानक तयार

उस्मानाबाद : तालुक्यातील केशेगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यातील पाकाची टाकी साफ करताना अचानक तयार झालेल्या गॅसमध्ये गुदमरून दोन युवक कामगारांचा मृत्यू झाला़ घरातील कर्ता युवक गेल्याने मयताच्या कुटुंबियांनी रूग्णालयाच्या आवारात एकच आक्रोश केला होता़ कामगारांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची उडालेली धांदल, निर्माण झालेला तांत्रिक बिघाड, अपुरे साहित्य आदी प्रकारामुळे जिल्हा रूग्णालयाचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला. रूग्णालयातील ढिसाळ कारभार व कारखान्यातील गैरसोयींबाबत नातेवाईकांनी यावेळी मोठा संताप व्यक्त केला़केशेगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याला आदर्श कामाबद्दल मराठवाड्यातच नव्हे तर राज्यातही नावाजले जाते़ मात्र, वारंवार घडणाऱ्या घटना, कामगारांचे होणारे मृत्यू या प्रकारामुळे कारखान्याकडून कामगारांच्या सुरक्षेबाबत अत्यावश्यक दक्षता घेण्यात येत नसल्याचा आरोप कामगारांसह केशेगाव ग्रामस्थ करीत आहेत़ या कारखान्यात केशेगाव, बेंबळी, अनसुर्डा, बोरखेडा, कनगरा, बामणी, पाटोद्यासह इतर विविध गावातील शेकडो कामगार कामाला आहेत़ कारखान्यातील कामगार असलेले नवनाथ नागोराव सपाटे (वय-३० रा़ केशेगाव), सागर भगवान बरडे (वय- २५), अहमद शौकत शहा (वय-३५ दोघे रा़ बेंबळी), शफीक महंमद पठाण (वय-३५ रा़ ढोकी) व ज्ञानेश्वर अरूण इंगळे (वय-३५ रा़ कनगरा) हे युवक मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामाला गेले होते़ कारखान्यातील पाकाच्या टाकीची साफसफाई करण्यासाठी व रंग देण्यासाठी यातील काही कामगार गेले असता, आतील साखर व पाकाचे राहिलेले घटक आणि रंग, पाण्याच्या एकत्रिकरणामुळे गॅसची निर्मिती झाली़ त्यामुळे काम करणारा एक कामगार गुदमरू लागला़ त्यावेळी तेथे उपस्थित दुसरा कामगार त्याला बाहेर काढण्यासाठी आतमध्ये गेला़ एकापाठोपाठ पाच जण एकमेकांना काढण्यासाठी त्या टाकीत गेले़ ही माहिती मिळाल्यानंतर इतर कामगारांनी तेथे धाव घेऊन त्यांना बाहेर काढले़ कारखान्यात अ‍ॅब्युलन्ससह इतर वाहन नसल्याने उस्मानाबादहून भाडे घेऊन आलेल्या एका टमटममध्ये चार कामगारांना घालून जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले़ तर एकाला कारखान्याच्या जीपमधून आणण्यात आले़ जिल्हा रूग्णालयात आणण्यात आल्यानंतर यातील नवनाथ नागोराव सपाटे याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले़ तर व्हेंटीलेटरवर असलेल्या सागर भगवान बरडे याचा काही मिनिटांतच उपचारादरम्यान मृत्यू झाला़ प्रकृती अत्यावस्थ असलेल्या कामगारांवर उपचार सुरू असताना अचानक जिल्हा रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाला़ त्यामुळे उपचार करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली़ प्रकृती अत्यवस्थ असलेल्यांना व्हेंटीलेटरची आवश्यकता असल्याने त्यांना तत्काळ शहरातील खासगी रूग्णालयात पाठविण्यात आले़ यातील अहमद शौकत शहा, शफीक महंमद पठाण या दोघांना स्पंदन रूग्णालयात तर व ज्ञानेश्वर अरूण इंगळे यांना डॉ़ डंबळ यांच्या रूग्णालयात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते़ रात्री उशिरापर्यंत त्यांची प्रकृती चिंताजनक होती़ दरम्यान, गॅसमध्ये गुदमरलेल्या कामगारांना जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर तेथून उचलून त्यांना ‘एमर्जन्सी’ विभागात नेण्याकामी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले नाही, असा नातेवाईकांचा आरोप आहे. याबरोबरच वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती असल्याने इतर कामगार, जखमींच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला़ एकाच डॉक्टरची धावपळपाकाच्या टाकीतील गॅसमध्ये गुदमरल्याने प्रकृती अत्यावस्थ असलेल्या पाच जणांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ ही माहिती मिळाल्यानंतर काही मिनिटांत डॉ़ मनोज देव्हारे हे रूग्णालयात दाखल झाले़ शिकावू वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी जखमींवर तात्काळ उपचार सुरु केले़ मात्र, इतर वैद्यकीय अधिकारी हे रूग्णालयात वेळेवर फिरकले नाहीत़ (प्रतिनिधी)जिल्हा रूग्णालयाचा प्रभारी कारभार डॉ़ वसंत बाबरे यांच्याकडे आहे़ मात्र, ते सुटीवर असल्याने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ चंचला बोडके यांच्याकडे रूग्णालयाचा पदभार आहे़ मात्र, त्याही रूग्णांना बाहेरील रूग्णालयात रेफर केल्यानंतर दाखल झाल्या़ इतकी गंभीर घटना घडलेली असतानाही वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर वैद्यकीय अधिकारी गायब असल्याने संताप व्यक्त होत होता़ गॅसमध्ये गुदमरल्याने बेंबळी येथील सागर बरडे व केशेगाव येथील नवनाथ सपाटे या युवक कामगारांचा मृत्यू झाला होता़ त्यानंतर नातेवाईकांनी लवकर शवविच्छेदन करण्याची मागणी लावून धरली होती़ मात्र, नेहमीप्रमाणेच या दोन्ही पार्थिवांचे शवविच्छेदन करण्यासाठी दीड ते दोन तास उशिर झाला़बेंबळी येथील सागर भगवान बरडे (वय-२५) हा युवक मागील १०-११ दिवस कारखान्यांवर कामासाठी गेला नव्हता़ दहा-अकरा दिवसानंतर तो मंगळवारी कामावर गेला होता़ मात्र, गॅसमध्ये गुदमरल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला़ त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे़ सोमवारी रात्रीच्या सुमारास मित्रांशी गप्पा मारणाऱ्या सागरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात त्याच्या मित्रांनी मोठी गर्दी केली होती़...तर वाचला असता नवनाथकारखान्यावरील कायम कर्मचारी असलेला केशेगाव येथील युवक नवनाथ नागोराव सपाटे (वय-३०) हा कामावर जाण्यापूर्वी व आल्यानंतर युवकांच्या गराड्यात असायचा़ कायापूर येथे एका मित्राच्या घरातील कार्यक्रम होता़ त्यामुळे त्याच्या मित्रांनी ‘मंगळवारी कामावर जावू नकोस’ असा आग्रह धरला होता़ दुपारी साडेबारा ते एक वाजेपर्यंत येतो म्हणून नवनाथ कामावर गेला होता़ मात्र, कारखान्यातील गॅसच्या टाकीत गुदमरल्याचे कळाल्यानंतर सर्वच मित्रांनी जिल्हा रूग्णालयाकडे धाव घेतली़ मात्र, रूग्णालयात नवनाथच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले होते़