शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात दोन बिल्डिंगवर हातोडा

By admin | Updated: December 11, 2014 00:46 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरात बुधवारीही बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम चालूच राहिली. नगर परिषदेच्या वतीने गट नं. ११८ मध्ये कारवाई करीत पथकाने दोन अतिरिक्त बांधकामांवर हातोड्याचे घाव घातले.

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरात बुधवारीही बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम चालूच राहिली. नगर परिषदेच्या वतीने गट नं. ११८ मध्ये कारवाई करीत पथकाने दोन अतिरिक्त बांधकामांवर हातोड्याचे घाव घातले. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराचे बांधकाम असल्याच्या कथित मुद्यावरून कारवाई करताना काही वेळ संघर्षही उडाला. अतिक्रमण हटाव पथकाचे सहकार्य घेऊन कारवाईचा जोर कायम सुरूच ठेवल्याने बांधकाम व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांतही भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पथकाने आजपर्यंत १७ ठिकाणी कारवाई केली आहे. गट क्रमांक ११८ मधील राघवेंद्र साकूरकर यांचे एका मजल्याचे बांधकाम पाडण्यात आले, तर इंदुदास रणनवरे पाटील यांनी पथकाला सांगितले की, तुम्ही ज्या व्यक्तीला नोटीस दिली तो माझा पार्टनर नाही, त्यामुळे पथकाने रणनवरे पाटील यांना परत नोटीस बजावली असून, पथक विशिष्ट मुदतीनंतर पुन्हा येईल, असे सांगण्यात आले. आमदाराचे बांधकाम ?मधुमालतीनगरातील जी प्लस ४ चे बांधकाम हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार रमेश कदम यांचे असल्याचे सांगून पथकावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला होता; परंतु एक एफएसआयचा नियम पथकाने दाखविला. अखेर दोन मजले खिळखिळे करण्यात आले. ११८ मधील मधुमालतीनगरातील प्लॉट नं. २ आणि ३ मधील पाच मजली इमारतीवर ताफा गेला अन् बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. तेव्हा खादीतील काही मंडळी आली व अहो साहेब, ही बिल्डिंग आ. रमेश कदम यांची असून, बांधकाम पाडणे थांबवा, असे सांगू लागली; परंतु माझ्याकडे थांबविण्याचा अधिकार नाही, तर पाडण्याचा आदेश आहे, त्यामुळे ते दोन मजले खिळखिळे केल्याचे सीईओ अशोक कायंदे म्हणाले.