शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

उमरग्यात अतिक्रमणावर हातोडा

By admin | Updated: November 17, 2015 00:29 IST

उमरगा : शहरातील पतंगे रोडलगत झालेल्या अतिक्रमणावर सोमवारी पुन्हा एकदा पालिकेने कारवाई करीत जवळपास १५० दुकाने काढली़ पालिकेच्या या कारवाईदरम्यान काही काळ तणावाचे

उमरगा : शहरातील पतंगे रोडलगत झालेल्या अतिक्रमणावर सोमवारी पुन्हा एकदा पालिकेने कारवाई करीत जवळपास १५० दुकाने काढली़ पालिकेच्या या कारवाईदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ मात्र, बंदोबस्तावरील पोलिसांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतल्याने संपूर्ण अतिक्रमणे पुन्हा एकदा हटविण्यात आली आहेत़उमरगा शहरातील पतंगे रोडलगत असलेल्या खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते़ पालिकेने सन २०१२ मध्ये ही दुकाने अतिक्रमण करून थाटण्यात आल्याचे कारण पुढे करीत नोटीसा बजावल्या होत्या़ त्यावेळी या दुकानदारांनी न्यायालयात धाव घेवून आपली बाजू मांडली होती़ तद्नंतर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्षांनी अतिक्रमणधारकांना पालिका गाळे बांधून देईल, असे आश्वासन दिले होते़ मात्र, मागील तीन वर्षात पालिकेकडून एकही गाळा बांधण्यात न आल्याने अतिक्रमण केलेल्या व्यवसायिकांनी रविवारी अचानक आपापल्या पूर्वीच्या जागेवर शेड मारण्यास सुरूवात केली होती़ यावेळी विविध राजकीय पक्षाचे पुढारीही उपस्थित होते़ अचानक पुन्हा एकदा अतिक्रमणे होवू लागल्याने पालिका कोणती भूमिका घेणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते़ मात्र, सोमवारी सकाळीच मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी पोलीस बंदोबस्तात पुन्हा एकदा अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली़ यावेळी काही व्यवसायिकांनी गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता़ मात्र, बंदोबस्तावरील पोलीस व मुख्याधिकारी यांनी कडक भूमिका घेत अतिक्रमण हटविले. यावेळी पोनि रांजणकर, पोउपनि मनोजकुमार लोंढे, कासले यांच्यासह पोलीस कर्मचारी, पालिकेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़