शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

वाळूज उद्योनगरीत ३०० अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:53 IST

एमआयडीसी प्रशासनाने सोमवारी वाळूज उद्योनगरीत अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करण्यात आली आहे.

वाळूज महानगर: एमआयडीसी प्रशासनाने सोमवारी वाळूज उद्योनगरीत अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत ३०० अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यात आला असून, रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविली जात आहे. या कारवाईमुळे चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

उद्योनगरीत कामगार चौक, तिरंगा चौक, मोरे चौक, महाराणा प्रताप चौक आदी मुख्य चौकात विविध छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी अतिक्रमणे करुन आपले व्यवसाय थाटले आहे. या मुख्य चौकात पानटपऱ्या, हॉटेल, गॅरेज, पत्र्याचे शेड आदी छोट्या व्यवसायिकांना अतिक्रमणे केली आहे. या अतिक्रमणाच्या जागेवर सुरु असलेल्या ठिकाणी खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत होती. बहुताश व्यवसायिकांनी मुख्य चौकात अतिक्रमणे थाटल्यामुळे स्वत:च्या जागेवर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनाही आडचणीचा सामना करावा लागत आहे. उद्योजकांनी या परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने उद्योनगरीत विविध ठिकाणी असलेली अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविली होती. मात्र, काही दिवसांतच अतिक्रमणे जैसे थे झाली होती.एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता सुनिल व्यवहारे, सर्व्हेअर आरेफ पठाणल गुलाब राठोड, राजु मगरे आदींनी पोलिस बंदोस्तात सोमवारी बजाजनगरातील मोरे चौकातून अतिक्रमणे हटविण्यास सुरवात केली.

या मोहिमेअंतर्गत पंढरपूरातील तिरंगा चौक, महावीर चौक, महाराणा प्रताप चौक, कामगार चौक, आंबेडकर चौक, एनआरबी चौक, झांबड चौक, मायलान कंपनी चौक आदी भागातील जवळपास ३०० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. तर काहींनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. यावेळी दोन जेसीबी व पाच ते सहा ट्रॅक्टरच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. १० सुरक्षा रक्षक तसेच एमआयडीसीच्या ३० पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. दिवसभर ही मोहिम राबविण्यात आली असून, पुढेही ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

लोकमतचे भाकित खरे ठरले‘लोकमत’ने राजकीय दबाव टाळण्यासाठी एमआयडीसी प्रशासन लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार असल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित केले होते. प्रशासनाने सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केल्याने लोकमतचे भाकित खरे ठरल्याचे नागरिकांतून बोलले जात होते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणWalujवाळूज