शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धे वर्षे सरले तरी निधी वाटप होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:41 IST

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांसाठी दिला जाणारा निधी अर्धे वर्षे सरले तरी बहुतांश यंत्रणांना वितरित झालेला नाही़ त्यामुळे उरलेल्या अर्ध्या वर्षात निधी मिळवून विकास कामे करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे़

प्रसाद आर्वीकर।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांसाठी दिला जाणारा निधी अर्धे वर्षे सरले तरी बहुतांश यंत्रणांना वितरित झालेला नाही़ त्यामुळे उरलेल्या अर्ध्या वर्षात निधी मिळवून विकास कामे करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे़जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शैक्षणिक, आरोग्य, कृषी, रोजगार आदी घटकांच्या विकास कामांसाठी निधी दिला जातो़ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या निधीला मंजुरी देवून तो संबंधित यंत्रणेद्वारे खर्च केला जातो़ यासाठी जिल्हा नियोजन समितीची कार्यकारिणी मंजुरीचे काम करीत असते़ परभणी जिल्ह्यात एप्रिल २०१७ पासून नवीन आर्थिक वर्षाला प्रारंभ झाला़ यावर्षासाठी १४१ कोटी ४६ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली़ त्यामुळे हा निधी विविध यंत्रणांना वितरित करून कामांना प्रारंभ होणे अपेक्षित होते़ मात्र आॅक्टोबर महिना उजाडला तरीही अनेक यंत्रणांना निधीचे वितरण झालेले नाही़ जिल्ह्यातील यंत्रणांनी निधीसाठी प्रस्ताव दाखल करणे गरजेचे असते़ अशा यंत्रणांकडून प्रस्तावच आले नसल्याने निधीचे वितरण रखडले आहे़ सहा महिन्यांमध्ये काही बोटावर मोजण्या इतक्याच यंत्रणांना निधी वितरित झाला आहे़ त्यात रस्ते विकासासाठी सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, लघु पाटबंधारे विभाग या विभागांना काही प्रमाणात निधी वितरित झाला असून, उर्वरित सर्व यंत्रणांच्या निधी वितरणाचे काम प्रक्रियेत आहे़ मागील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यातील यंत्रणांमध्ये जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्याविषयी उदासिन भूमिका राहिली आहे़ एप्रिल, मे महिन्यात निधीदेवूनही संपूर्ण वर्षभरात निधी खर्च होत नसल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत़ यावर्षी तर आॅक्टोबर महिना उजाडला तरी यंत्रणांना निधीच वितरित झालेला नाही़ त्यामुळे यापुढे यंत्रणांचे प्रस्ताव कधी दाखल होतील आणि केव्हा या यंत्रणा विकास कामे करतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ यामुळे विकास कामांसाठी निधीची तरतूद असतानाही कामे मात्र ठप्प आहेत.