व्यंकटेश वैष्णव , बीडआस्मानी संकटांचे आघात सहन करणाऱ्या बीडकरांवर आता सुलतानी संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून १ लाख ९१ हजार ५६९ एपीएल (केशरी) कार्डधारकांना स्वस्त धान्य मिळालेले नाही. त्यामुळे तब्बल ६ लाख ३२ हजार २९० इतक्या लोकांच्या ‘पोटा’पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेशनच्या पुरवठ्यालाच विलंब होत असल्याने हातावर पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.मागील चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असताना आता रेशनचे धान्य मिळणेही दुरापास्त बनले आहे. जिल्ह्यात एकून २ हजार १०० इतकी स्वस्त धान्य दुकाने आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार शहरी भागात ५ लाख १४ हजार ६८५ तर ग्रामीण भागातून २० लाख ७१ हजार २७७ च्या जवळपास स्वस्त धान्य दुकानाचे लाभार्थी आहेत. यामध्ये बीपीएल, अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय योजना, अन्नपुर्णा योजना तसेच एपीएल चे लाभार्थी आहेत. केंद्र सरकारकडूनच एपीएलचे धान्य येत नसल्याचे पुरवठा विभागातील अधिकारी लाभार्थ्यांना सांगत आहेत. यामुळे धान्य मिळत नाही म्हणून तक्रार करण्यासाठी आलेल्या गोरगरीबांना अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकून आल्या पावलांने परतावे लागत आहे.बीपीएल कार्डधारकांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्यात आला. मात्र एपीएल धारकांना वाऱ्यावर सोडून दिले असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. बीड तालुक्यातील भगवानवाडी येथील ग्रामस्थांना मागील अनेक महिन्यापासून स्वस्त धान्य मिळालेले नसल्यामुळे ग्रामस्थांनी गुरूवारी तहसील कार्यालयाकडे धाव घेवून तहसीलदारांकडे स्वस्त धान्याची मागणी केली आहे.पुरवठा अधिकारी सुर्यकांत सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एपीएल धारकांचे धान्य शासनाकडूनच मागील चार महिन्यापासून आलेले नाही. धान्य येताच वाटप करण्यात येईल असे ते म्हणाले.एपीएल अंतर्गत असलेल्या पावणेदोन लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांमधील केवळ ९ हजार ५०७ लाभार्थ्यांनाच अन्न सुरक्षा योजनेचा लाभ होत असल्याचे पुरवठा विभागातील माहितीपत्रकावरून स्पष्ट होते.शासनाकडून स्वस्त धान्य दुकानावरून देण्यात येणाऱ्या धान्याचा कोटा देखील तीस टक्याने घटविण्याचा निर्णय केंद्र शासनाने यापूर्वीच घेतलेला आहे.४बीड जिल्ह्यात मागील चार वर्षापासून अत्यल्प पाऊस पडत आहे. ४यातच शासन स्वस्त धान्यही वेळेवर देत नसल्याने गोरगरीब नागरिकांनी नाराजी व्यक्त करताना उपाययोजना करण्याची मागणी हेली.
सहा लाख लोकांचे रेशन बंद !
By admin | Updated: February 13, 2015 00:50 IST