शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

निम्मे नेपानगर फसले

By admin | Updated: July 29, 2014 01:14 IST

औरंगाबाद : सुपर पॉवर कंपनीने केवळ राज्यातच नव्हे तर महाराष्ट्रालगतच्या गावांतही आपले जाळे पसरविले होते.

औरंगाबाद : सुपर पॉवर कंपनीने केवळ राज्यातच नव्हे तर महाराष्ट्रालगतच्या गावांतही आपले जाळे पसरविले होते. विदर्भाच्या सीमेवर असलेल्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील नेपानगर तालुक्यातील शेकडो कुटुंबांनी आपली शेती, घर, दागदागिने विकून या कंपनीत गुंतवणूक केली असल्याचे समोर आले आहे. आता या कंपनीने गाशा गुंडाळल्यामुळे नेपानगरातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. औरंगाबादेत गुन्हा नोंदविण्यास नकारऔरंगाबाद पोलिसांनी सुपर पॉवरच्या संचालकांना अटक केल्याचे समजताच फसल्या गेलेले नेपानगरातील आठ ते दहा गुंतवणूकदार रविवारीच औरंगाबादेत दाखल झाले. मात्र, सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी त्यांना कुणी भेटलेच नाही. सोमवारी सकाळी या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा त्यांची तक्रार पोलिसांनी स्वीकारली नाही. ‘तुम्ही नेपानगरात पैसे भरलेले आहेत. तिकडेच तुम्हाला तक्रार द्यावी लागेल’ असे सांगून या गुंतवणूकदारांना परत पाठविण्यात आले. तक्रार देण्यासाठी आलेल्या नेपानगरातील गुंतवणूकदारांमध्ये प्रल्हाद कासारे, किशोरीलाल कठोतिया, वीरेंद्र पांझरे, मनोज चौरे, शिरीषकुमार रायबागकर, अशोक आर्या, शरदचंद्र मिस्त्रा यांचा समावेश आहे. आठ दिवसांपासून भटकंतीनेपानगरातील हे गुंतवणूकदार गेल्या आठ दिवसांपासून पैशांसाठी भटकंती करीत आहेत. आठ दिवसांपूर्वी ते महाराष्ट्रात आले. नाशिकला पारखेच्या घरी गेले. तेथे त्याच्या नातेवाईकांनी धमकावून हुसकावून लावले. मग ते नाशिक आयुक्तालयात गेले. तेथून त्यांना पंचवटी ठाण्यात पाठविण्यात आले. पंचवटी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार देऊन औरंगाबादला तक्रार द्या, असे सांगितले. औरंगाबादला आल्यानंतर येथेही त्यांची सोमवारी तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. शेवटी हताश होऊन ते गावाकडे परतले आहेत. विशेष म्हणजे या गुंतवणूकदारांकडे आज राहण्यासाठी, खाण्यासाठी आणि गावी जाण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. नेपानगराला साडेतीन कोटींचा चुनानेपानगरातील सुमारे साडेतीनशे कुटुंबांनी सुपर पॉवर कंपनीत गुंतवणूक केलेली आहे. गुंतवणुकीची एकूण रक्कम सुमारे साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे समोर आले आहे. औरंगाबादेतील रहिवासी असलेल्या कैलास महाजन या व्यक्तीने नेपानगरात जाऊन तेथील नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडले होते, असे येथील नेपानगरातून आलेले किशोरीलाल कठोतिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. फसल्या गेलेले जवळपास सर्वच जण गरीब आहेत. कुणी शेती विकली, कुणी दागदागिने गहाण ठेवले, तर कुणी सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम या कंपनीत गुंतविली होती, असेही कठोतिया म्हणाले. गुंतवणूकदार म्हणतात...गावी गेलो तर लोक ठार मारतील!औरंगाबादेत तक्रार देण्यासाठी आलेले हे गुंतवणूकदार प्रचंड दहशतीत होते. कारण या गुंतवणूकदारांच्या सांगण्यावरून त्यांच्या शेकडो नातेवाईकांनीही गुंतवणूक केलेली आहे. आमचे पैसे घेऊन परत या, नाही तर ठार मारू, असे इतर गुंतवणूकदारांनी आम्हाला धमकावले आहे. आता गावात जावे तरी कसे? असा सवाल नेपानगरहून आलेल्या शिरीषकुमार रायबागकर यांनी उपस्थित केला. पोलिसांकडूनकार्यालयाची झाडाझडती सुपर पॉवर या कंपनीचे सिंधी कॉलनीत असलेल्या कार्यालयाची आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी झडती घेतली. या कार्यालयातून काही धनादेश, महत्त्वाची कागदपत्रे, संगणक जप्त करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत झडती सुरू होती.