उस्मानाबाद : उस्मानाबादसह भूम, वाशी, कळंब, उमरगा, लोहारा तालुक्याच्या काही भागात सोमवारी अवकाळी पाऊस झाला़ वाशी व परिसरात काही ठिकाणी गारपीट झाली असून, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे़भूम शहरासह परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला़ तालुक्यातील हाडोंग्री, दिंडोरी, नांदगाव, आरसोली, हिवरा, गोलेगाव, सोनगिरी, भोनगिरी आदी भागात पाऊस झाला़ भूम सर्कलमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे़ तर दिंडोरी, हिवरा, आरसोली, हाडोंग्री भागातील पिकांसह फळबागांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले़ कळंब तालुक्यातील इटकूर, गंभिरवाडी, पाथर्डी, भोगजी भागातही सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला़ तर वाशी शहरासह तालुक्यात काही भागात गारपीट झाली़ उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे दुपारी झालेल्या पावसामुळे बाजारकरूंचे मोठे हाल झाले़ तर उस्मानाबाद तालुक्यातील येडशीसह परिसरात रात्रीच्या सुमारास काही काळ पाऊस झाला़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यात अवकाळीसह गारपिटीचा कहर सुरूच
By admin | Updated: April 14, 2015 00:47 IST