शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

खुनाच्या निषेधार्थ जळकोट बंद

By admin | Updated: December 28, 2015 23:25 IST

जळकोट : येथील तरुण व्यापाऱ्याचे अपहरण करून खून केल्याच्या निषेधार्थ सोमवारी जळकोटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

जळकोट : येथील तरुण व्यापाऱ्याचे अपहरण करून खून केल्याच्या निषेधार्थ सोमवारी जळकोटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, मराठवाड्यातील आर्य वैश्य समाजातील जवळपास दोनशे कार्यकर्त्यांची आंदोलनात उपस्थिती होती. १८ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आलेल्या रोहित दिलीप कोंडावार यांचा खून झाल्याचे निष्पन्न होताच जळकोट शहरात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. सोमवारी आठवडी बाजार असतानाही संतप्त नागरिकांनी दिवसभर बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध केला. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, पोलिस महासंचालकांना दिले आहे. रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास जळकोट पोलिस ठाण्यात आर्य वैश्य समाजातील कार्यकर्त्यांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष व्यंकट तेलंग, भाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजी केंद्रे, रमाकांत रायेवार, व्यंकटराव कोटगिरे, प्रकाश गट्टेवार, कृष्णा कोटलवार, प्रदीप कोकडवार, दिगंबर लाभशेटवार, सूर्यकांत कोकड, अतुल चालिकवार, प्रा. सुनील वट्टमवार, राम वट्टमवार आदींची उपस्थिती होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. दरम्यान, पोलिसांचे पथक मृतदेहाचा शोध व पंचनाम्यासाठी रवाना होणार असल्याचे उपविभागीय अधिकारी विजय कबाडे यांनी सांगितले. या प्रकरणामुळे पोलिस उपविभागीय अधिकारी कबाडे हे जळकोट शहरात दिवसभर तळ ठोकून आहेत. पोलिसांनी आठ आरोपींना ताब्यात घेतले असून, आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. अपहरण झाल्यापासून पोलिस उपनिरीक्षक पी.जी. शिरसे व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा योग्य दिशेने तपास करीत असल्याचे सांगण्यात आले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक लता फड यांनी जळकोट शहराला भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. (वार्ताहर)भावजींच्या आर्थिक व्यवहारातून मेहुणा रोहित दिलीप कोंडावार यांचे अपहरण करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्याच्या दिवसापासूनच पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत टप्प्या-टप्प्याने संशयितांना अटक केली होती. संशयितांना अटक करताच रोहितचा तपास लागण्याची शक्यता बळावली. रोहितचा मृतदेह कर्नाटक राज्यात आढळून आल्याची माहिती कर्नाटक पोलिसांकडून मिळताच शहरात संतापाची लाट उसळली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन वाहने जप्त...४या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर कलम ३०२, २०१, १२० (ब) प्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना ३० डिसेंबरपर्यंत, दोन जणांना २ जानेवारीपर्यंत व अन्य तीन जणांना ६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेत वापरण्यात आलेली एमएच २४ व्ही ०६१५, एमएच ०१ एसी ८२०३ ही दोन वाहने जळकोट पोलिसांनी जप्त केली आहेत.