शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
4
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
5
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
6
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
7
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
8
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
9
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
10
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
11
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
13
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
14
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
15
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
16
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
17
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
18
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
19
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
20
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?

गारपीट मदत वाटप यादीत गोंधळच गोंधळ

By admin | Updated: June 11, 2014 00:34 IST

केळीगव्हाण: बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील सुमारे सातशे शेतकऱ्यांचे गारपिटीत मोठे नुकसान झाले होते.

केळीगव्हाण: बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील सुमारे सातशे शेतकऱ्यांचे गारपिटीत मोठे नुकसान झाले होते. तीन महिन्यानंतर आता बँकेने केवळ २९२ पात्र लाभार्थ्यांची यादी लावली. त्यामुळे अर्धेअधिक गावच्या शेतकऱ्यांना मदत यादीतून वगळ्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यादीत मोठा गोंधळ झाल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.बदनापूर तालुक्यात फेबु्रवारी व मार्च महिन्यात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. सलग तीन वेळा गाव व परिसरातील शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका बसला. त्यात शेतातील गहू, ज्वारी, हरभरा तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानीची अनेक राजकीय पुढाऱ्यांनी तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच महसूल विभाग व कृषि विभागाच्या वतीने संयुक्तपणे त्याचे पंचनामेही करण्यात आले. त्यात गावातील ५० टक्क्यांच्यावर नुकसान झालेल्या सुमारे ६०० ते ७०० शेतकरी होते. तसेच ५० टक्क्यांच्या आत नुकसान झालेले ५०० च्यावर शेतकरी आहेत. शासनाच्या नियमानुसार ५० टक्क्यांच्यावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना गारपिटीचे अनुदान वाटप करण्यात येत आहे. जिल्हाभरात अनेक ठिकाणी बँकामार्फत हे अनुदान वाटप करण्यात आले. केळीगव्हाण गावातील शेतकऱ्यांना मात्र अनुदानासाठी आतापर्यंत वाट पाहावी लागली. सोमवारी गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेलगाव शाखेत लागली. मात्र यादीत फक्त २९२ शेतकऱ्यांचीच नावे त्यात आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकरी वंचित राहिले आहे. नव्याने पंचनामे करुन तात्काळ अनुदान वाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)पुरवणी यादी तयार करण्याची मागणीपन्नास टक्क्यांच्यावर नुकसान होवून व त्याचे रितसर पंचनामेही करण्यात आले. मात्र बँकेत यादी लावल्यानंतर अनेकांचे नावे गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला. नावे गायब झाली कशी? त्याची चौकशी करण्यात यावी व पुरवणी यादी तयार करून त्यात वगळलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी रामनाथ मदन, काकासाहेब मदन, निवृत्ती मदन , अरूण मदन, भगवान मदन आदींनी केली आहे.