शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये घरात लावलेल्या गुटखा पॅकिंगच्या कारखान्याचा पर्दाफाश, 21 लाख रुपयांचा गुटखा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 15:40 IST

औरंगाबादमधील मुकुंदवाडी परिसरातील विनायक कॉलनी आणि चिकलठाणा येथील हिनानगर येथे घरात सुरू असलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर अन्न व औषधी प्रशासन विभागाने शुक्रवारी ( 1 सप्टेंबर ) एकाचवेळी धाडी मारल्या. या कारवाईत दोन्ही कारखान्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपॅकेजिंग मशिनसह सुमारे 21 लाख रुपयांचा गुटखा जप्तकारवाईपासून स्थानिक पोलिसांना ठेवले दूरनांदेड, बीड व उस्मानाबादमधील एफडीएच्या अधिका-यांची कारवाई

औरंगाबाद, दि. 1 - मुकुंदवाडी परिसरातील विनायक कॉलनी आणि चिकलठाणा येथील हिनानगर येथे घरात सुरू असलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर अन्न व औषधी प्रशासन विभागाने शुक्रवारी ( 1 सप्टेंबर ) एकाचवेळी धाडी मारल्या. या कारवाईत दोन्ही कारखान्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान सुमारे 21 लाख रुपयांचा गुटखा आणि यंत्र जप्त करण्यात आली आहेत. शहरात अशाप्रकारे सुरू असलेल्या गुटख्यांच्या कारखान्याचा प्रथमच पर्दाफाश झाला. विशेष म्हणजे या कारवाईपासून पोलिसांना दूर ठेवण्यात आले.याविषयी अधिक माहिती देताना अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रकांत पवार म्हणाले की, राज्यात गुटखा बंदी आहे. असे असताना शहरात खुलेआम गुटखा विक्री होत असल्याच्या बातम्या सतत येत असतात. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. शहराबाहेरून गुटखा येऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे. असे असताना शहरात दोन ठिकाणी गुटख्याचे कारखाने सुरू असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली. या माहितीची खात्री करण्यात आली. यानंतर या कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही तीन पथके तयार केली. विशेष म्हणजे या कारवाईसाठी नांदेड, बीड आणि उस्मानाबाद येथील अधिका-यांना बोलावून घेतले. तीन पथकांनी एकाचवेळी विनायक कॉलनी आणि चिकलठाणा येथील हिनानगर येथील कारखान्यावर धाडी मारल्या.विनायक नगर येथील एका घरात सुरू असलेल्या या कारखान्यावर सहआयुक्त पवार, सहायक आयुक्त अभिमन्यू केसरे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, दयानंद पाटील, उमेश कावळे, नमूना सहायक पांडुरंग नाडे आणि प्रमोद शुक्ला यांनी कारवाई केली.  घरमालक हनुमंत श्रीपत मुंढे (रा.विनायक कॉलनी) आणि मोहसीन सय्यद(रा.ब्रहाणपुर, मध्यप्रदेश) यांनी हा कारखाना सुरू केल्याचे समजले. या कारखान्यात आर.एम.डी. माणिकचंद, गोवा, हिरा, अशा वेगवेगळ्या लेबल असलेल्या  पॅकेज गुटख्याचा मोठा साठा आढळला. शिवाय गुटखा पॅकिंग करण्याची मशीन, कच्चा माल आढळून आला. मात्र, घरमालक मुंढे हा घरी आढळला नाही. यावेळी मोहसीन सय्यदच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.  

हिनानगर येथे ही छापा हिनानगर येथील कारखान्यावर सहआयुक्त रामेश जाधव, राम मुंढे, संतोष कंकवाड,संजय चट्टे, निखील कुलकर्णी, फरीद सिद्दीकी आणि अशोक पारधी यांच्या पथकाने कारवाई केली. तेथेही सुमारे दहा लाख रुपयांचा गुटखा आणि पॅकेजिंग मशिन, कच्चा माल मिळाल्याचे सहआयुक्त पवार यांनी सांगितले.