शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींनी युवा वैज्ञानिक घडवावेत

By admin | Updated: September 15, 2015 00:32 IST

वाशी : आपला देश डॉ. होमी भाभा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या शास्त्रज्ञांच्या योगदानामुळेच पुढे जात आहे. यापुढेही देशातील सामाजिक समस्यावर मात

वाशी : आपला देश डॉ. होमी भाभा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या शास्त्रज्ञांच्या योगदानामुळेच पुढे जात आहे. यापुढेही देशातील सामाजिक समस्यावर मात करण्यासाठी युवा वैज्ञानिक घडणे गरजेचे असल्याचे सांगत हे काम गुरूजनांनी करावे, असे आवाहन अ‍ॅड. धीरज पाटील यांनी केले. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये जिल्हास्तरीय इन्सपायर्ड अ‍ॅवार्ड सन २०१५ चे उद्घाटन जि. प. अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष सुधाकर गुंड होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. उबाळे, महिला बाल कल्याण सभापती लता पवार, पं. स. सभापती मनिषा घुले, जि. प. सदस्य प्रशांत चेडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बिभीषण खामकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढत असल्याचे सांगत सर्व शाळांत ई-लर्निंगसाठी उपक्रम सुरू करण्यासाठी जि. प. च्या फंडातून १० लाख रूपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचेही अ‍ॅड. पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सुधाकर गुंड, जि. प. सदस्य प्रशांत चेडे, उबाळे यांनीही भाषणे झाली. जिल्हास्तरीय इन्सपायर अ‍ॅवार्ड विज्ञान प्रदर्शनात ४३३ इन्सपायर अ‍ॅवार्ड मिळवणारे बाल वैज्ञानिक सहभागी झाले असून, २५ स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी उकिरडे यांनी तर आभार उपशिक्षणाधिकारी कादर शेख यांनी मानले. हे प्रदर्शन दोन दिवस चालणार असून, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी, मुख्याध्यापक परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमासाठी आलेल्या शिक्षणप्रेमीना बसण्याची व्यवस्था मात्र शिक्षण विभागाने केलेली नव्हती. (वार्ताहर)