शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत पाणीपुरवठा योजनांच्या नव्या निकषांबाबत मार्गदर्शन

By admin | Updated: August 7, 2014 23:30 IST

हिंगोली : कार्यशाळेसाठी १२८ गावांच्या पाणीपुरवठा समिती अध्यक्ष व सचिवांची उपस्थिती होती.

हिंगोली : राष्ट्रीय पेयजल योजनेतील पाणीपुरवठा योजनांसाठी बदललेल्या निकषांबाबत मार्गदर्शनासाठी हिंगोलीत घेण्यात आलेल्या कार्यशाळेसाठी १२८ गावांच्या पाणीपुरवठा समिती अध्यक्ष व सचिवांची उपस्थिती होती. नव्याने आलेल्या ४ शासन निर्णयांमुळे पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती मिळणार आहे. त्यामुळे यावर मार्गदर्शन करण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण कामे होण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे, कार्यकारी अभियंता गंगाधर एंबडवार आदींनी मार्गदर्शन केले. शासनाने आता पाणीपुरवठा योजनेसाठी दहा टक्के लोकवर्गणी माफ केली आहे. तसेच लोकसंख्येनुसार दरडोई वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली आहे. २00२ पासून २0१३ पर्यंतचे दर रद्द करून नवीन दर लागू केले आहेत. त्यामुळे योजनांची किंमत वाढणार आहे. या शिवाय खर्चाच्या अधिकारामध्येही बदल केला आहे. पूर्वी कार्यकारी अभियंत्यांना ५0 लाखांपर्यंतच्याच कामांना तांत्रिक मान्यता देता येत होती. आता २ कोटींपर्यंत देता येईल. तसेच अधीक्षक अभियंत्यांना ५ ते ७.५ कोटींपर्यंतच्या कामास तर त्यापुढील काम शासनाकडे मान्यतेसाठी पाठविल्यानंतर तांत्रिक मान्यता मिळणार आहे. कार्यकारी अभियंता एंबडवार यांनी प्रोजेक्टरद्वारे योजनेविषयी माहिती दिली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांनी मार्गदर्शन करताना पाणी ही प्रत्येकाची मुलभूत गरज असल्याने ही कामे गुणवत्तापूर्णच झाली पाहिजे, असे आग्रहपूर्वक पाहण्याचे आवाहन केले. यावर्षीच्या आराखड्यात ३९ गावांना पाणीपुरवठा मंजूर आहे. त्यामुळे या ग्रामस्थांनी विशेष लक्ष देण्याचे आवाहनही केले.सूत्रसंचालन संघरत्न नरवाडे यांनी केले. तर राजेंद्र सरकटे यांनी आभार मानले. (जिल्हा प्रतिनिधी)