जालना : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सर्व्हे क्र. ४८८ मधील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील विविध विकास कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. यावेळी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, नगर रचनाकार सु.आ. पवार, सहाय्यक संचालक (प्रादेशिक योजना) एस.जे. सदामते, सहाय्यक विवेक देशमुख आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री लोणीकर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याच्या रकमेचे वाटप तातडीने करण्याच्या सूचना केल्या. त्याच प्रमाणे जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या पिकासाठी बऱ्याच भागामध्ये पीक विमा लागू झालेला नाही. या बाबत मत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने आवश्यक ती माहिती पुरवावी. मागील वर्षीच्या परंतु चालू वर्षामध्ये दुष्काळी अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले होते. त्यामध्ये सर्वच तालुक्यात अनेक गावे वंचित राहिलेली आहेत. जिल्हा स्तरावरुन अशा वंचित शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी १४ कोटी ८५ लाखांचा सुधारित मागणी पस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आलेला आहे. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना उपस्थितांना दिल्या आहेत.त्याच प्रमाणे जिल्ह्यातील रस्ते विकास, प्रादेशिक नियोजन मंडळाचे कामकाज यासह इतर विषयावर अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन जिल्ह्यातील कामे व शासकीय निधीचा खर्च अधिक जलदगतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याच्या रक्कमेचे वाटप तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. त्याच प्रमाणे जिल्हयामध्ये सोयाबीनच्या पिकासाठी बऱ्याच भागामध्ये पीक विमा लागू झालेला नाही. या बाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने आवश्यक ती माहिती पुरवावी.
पालकमंत्री लोणीकर यांनी घेतला आढावा
By admin | Updated: July 14, 2016 01:00 IST