कळंब : कळंब येथे नाफेडमार्फत सुरु करण्यात आलेल्या हरभरा हमीभाव खरेदी केंद्रावर काही शेतकऱ्यांनी दिलेल्या हरभऱ्याचे वजन आणखीही करण्यात न आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनीच यामध्ये हात धुवून घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.कळंब येथे नाफेडमार्फत हरभरा हमी भाव खरेदी केंद्र एप्रिल २०१४ मध्ये कळंब तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले होते. तालुक्यातील १२८ शेतकऱ्यांनी १० मे २०१४ पर्यंत या केंद्रावर ५ ते ६ हजार क्विंटल हरभरा खरेदीसाठी दाखल केला होता. यातील काही शेतकऱ्यांचा हरभरा संबंधित यंत्रणांनी जमा करुन घेतला. परंतु त्याचे वजनमापेच न केल्याने त्या शेतकऱ्यांना अजूनही हरभऱ्याचे पैसे मिळाले नाहीत. हा हरभरा खरेदी-विक्री संघाने डिकसळ येथील गोदामात ठेवला असून, पैशासाठी या शेतकऱ्यांची फरफट चालूच आहे.शेतकऱ्यांची झाली हेळसांडया खरेदी केंद्रावर आलेल्या काही शेतकऱ्यांनी हरभरा वजन मापे करण्यासाठी दिला होता. परंतु अनेक दिवस प्रतीक्षा करुनही त्याचे वजनमाप न झाल्याने काही शेतकऱ्यांनी कंटाळून हरभरा परत नेला. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते, अशी माहितीही काही शेतकऱ्यांनी दिली. (वार्ताहर)हरभरा खरेदीमध्ये संबंधित यंत्रणांनी खुल्या बाजारात अत्यल्प दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला हरभरा या केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर जमा करुन घेतला. लागोलाग त्याची वजनमापे करुन त्यांचे पैसेही दिल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होतो आहे. परंतु शेतकऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करुनही हरभऱ्याचे वजनही झाले नाही आणि पैसेही मिळाले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. काही राजकीय पुढाऱ्यांनीही या हमीभावात कमाई करुन घेतल्याची चर्चा आहे.या हमीभाव खरेदी केंद्रावरील सावळा गोंधळ गोरोबा माळी (गौर), दादासाहेब देशामुख (गौर), दिलीप पाटील (गौर) व सुंदरराव लोमटे (जवळा खु.) या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार तसेच जिल्हाधिाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. या शेतकऱ्यानंतर इतरांनी दिलेल्या हरभऱ्याचे वजन या यंत्रणांनी केले, त्याचे पैसेही अदा झाले, परंतु या शेतकऱ्यांचा माल अजूनही पडून असल्याचे त्यांनी प्रशासनाला कळविले होते. याची दखल घेवून हे प्रकरण संवेदनशील असून, त्याबाबत त्वरित कार्यवाही करावी, असे पत्र कळंब तहसीलदारांनी १२ आॅगस्ट २०१४ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले होते. त्यावर अद्यापही कार्यवाही करण्यात आली नाही.हरभऱ्याचे पैसे देणे अशक्य : कावळे४हमीभाव खरेदी केंद्रावर दाखल केलेल्या हरभऱ्याचा पंचनामा नाफेडमार्फत करण्यात आला. परंतु त्याची प्रतवारी व्यवस्थित नसल्याने त्या मालाचे वजन करण्यात आले नाही. तो माल अजूनही गोदामात पडून आहे. हा माल जवळपास दीडशे क्विंटलच्या आसपास आहे. या मालाचे पैसे देणेही शक्य नाही. खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांच्या मालाला प्राधान्य देण्यात आल्याचा आरोपही चुकीचा असल्याचे कळंब तालुका खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक कावळे यांनी सांगितले.
हमी केंद्रावर हरभरा पिकाचे वजन रखडले
By admin | Updated: September 29, 2014 00:41 IST