शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचे दु:ख दोनदा कोसळले; अंत्यविधी झाल्याचा नातेवाईकांचा समज झाला अन मृतदेह ४ दिवस घाटीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 20:00 IST

सुपर स्पेशालिटीच्या इमारतीत उपचार सुरू असताना ४ डिसेंबर रुग्णाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देनातेवाईकांनी आणून दिली मृत्यूपावती 

औरंगाबाद : ७२ वर्षीय कोरोना रुग्णाचा मृतदेह तब्बल ४ दिवस घाटीतील शवागृहातच पडून राहिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली. अंत्यविधी प्रशासनाकडून केला जाईल म्हणून मृतदेह पाहून नातेवाईक निघून गेले; परंतु मनपाकडून अंत्यविधीची परवानगी आणण्यासाठी नातेवाईकच नसल्याने मृतदेह तसाच राहिला. या प्रकाराविषयी नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अखेर या मृतदेहावर  मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शहानूरवाडी येथील ७२ वर्षीय व्यक्तीस कोरोनाच्या उपचारासाठी २५ नोव्हेंबर रोजी घाटीत दाखल करण्यात आले.  सुपर स्पेशालिटीच्या इमारतीत उपचार सुरू असताना ४ डिसेंबर रुग्णाचा मृत्यू झाला. नातेवाईकांना ही माहिती देण्यात आली. रुग्णवाहिकेत मृतदेह पाहून नातेवाईक घाटीतून रवाना झाले. मात्र, मंगळवारी घाटीतून नातेवाईकांना फोन आला आणि रुग्णाचा अंत्यविधी बाकी असून, घाटीत येण्यास सांगण्यात आले. ही बाब ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला. ४ डिसेंबर रोजी अंत्यविधी झालेला असताना आता पुन्हा का बोलविण्यात आले, ४ तारखेला अन्य व्यक्तीचाच अंत्यविधी झाला का, असा प्रश्न नातेवाईकांना पडला. त्यामुळे त्यांनी घाटीत धाव घेतली. तेव्हा घडलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मनपाकडून अंत्यविधीची परवानगी आणून अखेर बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. 

समन्वय, संवादाचा अभाव४ तारखेला रात्री ११ वाजता मृत्यूची माहिती देण्यात आली. अंत्यविधी केला जाईल, असे सांगितले; परंतु त्यासाठी मनपाकडून आम्हाला परवानगी आणावी लागते, हे सांगितले नाही. हे जर सांगितले असते तर इतके दिवस वडिलांचा मृतदेह घाटीत राहिला नसता. फोन नंबर दिलेले होते; परंतु घाटीत संवाद, समन्वय नसल्याने हा प्रकार झाल्याचे रुग्णाच्या मुलाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

घाटी प्रशासन म्हणाले...वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे म्हणाले, नातेवाईकांनी दिलेला माेबाईल क्रमांक लागत नव्हता. अंत्यविधीसाठी मनपाची परवानगी नातेवाईकांना आणावी लागते; परंतु मृतदेह पाहून ते रवाना झाले. त्यामुळे मृतदेह तसाच राहिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी