शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

अभिवादनास उसळला भीमसागर

By admin | Updated: April 15, 2016 00:36 IST

बीड : ‘जय भीम’चा जयघोष, निळे झेंडे, नीळची उधळण व बेधुुंद झालेले अबालवृद्ध अशा सळसळत्या उत्साहात गुरुवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १२५ व्या जयंतीनिमित्त मानवंदना देण्यात आली.

बीड : ‘जय भीम’चा जयघोष, निळे झेंडे, नीळची उधळण व बेधुुंद झालेले अबालवृद्ध अशा सळसळत्या उत्साहात गुरुवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १२५ व्या जयंतीनिमित्त मानवंदना देण्यात आली. शहरात डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादनासाठी अक्षरश: जनसागर उसळला होता. ठिकठिकाणच्या मिरवणुकांनी संपूर्ण आसमंत दणाणून गेला. तथापि, पोलीस प्रशासनाने जागोजागी नाकाबंदी करुन शहरात येणारे डीजे बाहेरच रोखून जप्त केले. त्यामुळे तरुणाईचा हिरमोड झाला.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बुधवारी रात्री साडेअकरा वाजता समता ज्योत निघाली. यावेळी अधीक्षक अनिल पारसकर यांनी समता ज्योत हाती घेतली. बशीरगंज, कारंजा, माळीवेस, सुभाष रोडमार्गे समता ज्योत मध्यरात्री १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दाखल झाली. तेथे फटाक्यांची आतषबाजी व रोषणाई करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माचे हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले. गुरुवारी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून धम्मरूलीला प्रारंभ झाला. यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते, महिला- पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचल्यावर अभिवादन सभा घेण्यात यावेळी पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. भन्ते पट्टीसेन यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन कार्यक्रमांना सुरुवात झाली. यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, उपअधीक्षक गणेश गावडे, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, राकॉ जिल्हाध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, माजी आ. राजेंद्र जगताप, प्रा. सुशीला मोराळे, प्रा. सर्जेराव काळे, अशोक हिंगे, जि.प.सभापती संदीप क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, डॉ. जितेंद्र ओव्हाळ, दिलीप धूत, दिलीप भोसले, अजय सवाई, अ‍ॅड. सर्जेराव तांदळे, विक्रांत हजारी, अजिंक्य चांदणे, अ‍ॅड. सुभाष राऊत, संदीप उपरे, प्रा. प्रदीप रोडे, अमरसिंह ढाका, शीतलकुमार सुकाळे, एस. टी. गायकवाड, शुभम धूत उपस्थित होते.रात्री साडेसात वाजेनंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मुख्य मिरवणुकांमध्ये इतर उत्सव समितीच्या मिरवणुकाही सहभागी झाल्या. जालना रोड, सुभाष रोडमार्गे मिरवणुका डॉ. आंंबेडकर पुतळ्याच्या दिशेने निघाल्या. यावेळी तरूणाईसह ठिकठिकाणी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत झाले. (प्रतिनिधी)सकाळपासून अभिवादनासाठी नागरिकांचे लोंढे डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. गर्दीने पुतळा परिसर फुलून गेला होता. दिवसभर अभिवादनासाठी नागरिकांची गर्दी होती. सायंकाळी मिरवणुकांना प्रारंभ होण्यापूर्वीच डीजे जप्तची कारवाई झाल्याने आवाजाचा दणदणाट नव्हता. त्यामुळे मिरवणुका निघण्यास विलंब झाला.सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. आंबेडकरांची प्रतीमा मिरवणूक विद्युत रोषणाई व फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथातून काढण्यात आली. यावेळी अबालवृद्ध, महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या.डीजेसाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे ढोलताशा, डफ, तुतारी, पिपाणी अशा पारंपरिक वाद्यवृंदांसह दिमाखात मिरवणुका निघाल्या.