शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांचा औरंगाबादेत भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 11:18 IST

‘एमपीएससी’तील सर्व पदांची प्रतीक्षा यादी जाहीर करा, ‘पीएसआय’ची स्वतंत्र पूर्व परीक्षा घ्या, खाजगी संस्थांवरील शिक्षक भरती शासनाने करावी, परीक्षा शुल्कांवरील जीएसटी रद्द करावी, कंत्राटी पदभरती धोरण रद्द करा, रिक्त जागा भरा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.६) काढण्यात आलेल्या मोर्चात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयाचा मार्ग दणाणून गेला.

ठळक मुद्देआंदोलन : घोषणांनी शहर दणाणले

औरंगाबाद : ‘एमपीएससी’तील सर्व पदांची प्रतीक्षा यादी जाहीर करा, ‘पीएसआय’ची स्वतंत्र पूर्व परीक्षा घ्या, खाजगी संस्थांवरील शिक्षक भरती शासनाने करावी, परीक्षा शुल्कांवरील जीएसटी रद्द करावी, कंत्राटी पदभरती धोरण रद्द करा, रिक्त जागा भरा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.६) काढण्यात आलेल्या मोर्चात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयाचा मार्ग दणाणून गेला.

जय भगवान महासंघ महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीतर्फे सकाळी ११ वाजता हा मोर्चा काढण्यात आला. राज्यात गेल्या काही वर्षांपासून रिक्त पदे भरली जात नसल्याने स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना नोकरीसाठी नुसती वाट बघावी लागत आहे. याविषयी विद्यार्थ्यांनी मोर्चाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.

‘तलाठी ३०८४ पदाची रिक्त पदे भरावी’, ‘जिल्हा परिषदेची एकही शाळा बंद करू नये’, ‘परीक्षेत बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी’, ‘३० टक्के नोकर भरती कपातीचे धोरण रद्द करावे, अशा विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले. विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, जय भगवान महासंघ विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष राज आव्हाड, सचिन डोईफोडे, बाबा मिसाळ, विशाल सानप, योगेश जाधव आदींची उपस्थिती होती. विभागीय आयुक्तालयासमोरील मैदानावर जोरदार घोषणाबाजीने मोर्चाची सांगता झाली. समितीतर्फे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन देण्यात आले.

५०० स्वयंसेवकांची फौजमोर्चा शांततेत आणि सुरळीत पार पडावा, यासाठी ५०० स्वयंसेवकांची फौज प्रयत्नशील होती. विशेषत: विद्यार्थिनींना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. वॉकीटॉकीच्या मदतीने संपर्क साधून स्वयंसेवक वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, मोर्चाची शिस्त बिघडणार नाही, याची प्रामुख्याने काळजी घेत होते.

विद्यार्थ्यांना पाणी वाटपमोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी विविध संस्थांकडून पाणी, बिस्किटांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. पाण्याचे पाऊच, वाटलेली पत्रके रस्त्यावर पडत होती. हे पाहून अनेकांची हाते हा कचरा दूर करण्यासाठी सरसावली.

हजारोंचा सहभागपहिल्यांदाच मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने मोर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधले. तीन हजारांवर विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. गर्दीमुळे क्रांतीचौकाकडे येणारी वाहतूक वळविण्यात आली होती.

अन्य काही मागण्याराज्यात शिक्षकांची रिक्त २३,४३५ पदे केंद्रीय पद्धतीने अभियोगितेद्वारे भरावी.जि.प.,जलसंपदा, समाजकल्याण, महिला व बालविकास, तलाठी, महसूल विभागातील जागा भराव्यात.परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवावे.डमी परीक्षार्थीच्या रॅकेटवर आळा घालण्यासाठी परीक्षा बायोमेट्रिक पद्धतीने घ्यावात.पोलीस पदाची महाभरती लवकर घेण्यात यावी.राज्यात भरती प्रक्रियेचा तामिळनाडू पॅटर्न राबवावा.प्रत्येक खात्यातील पदभरती ही शासनानेच करावी.