शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

ग्रामीण पोलीस, युनायटेड ब्रेव्हरीज विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:09 IST

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक टी-२0 औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत युनायटेड ब्रेव्हरीजने कॉस्मो फिल्म संघावर मात केली. दुसºया लढतीत औरंगाबाद ग्रामीण पोलीसने शहर पोलीस ब संघावर ९ विकेटने विजय मिळवला.

ठळक मुद्देव्हेरॉक करंडक : पंकज फलके, अजय काळे सामनावीर

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक टी-२0 औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत युनायटेड ब्रेव्हरीजने कॉस्मो फिल्म संघावर मात केली. दुसºया लढतीत औरंगाबाद ग्रामीण पोलीसने शहर पोलीस ब संघावर ९ विकेटने विजय मिळवला.सकाळच्या सत्रात युनायटेड ब्रेव्हरीजने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ९ बाद ११९ धावा केल्या. त्यांच्याकडून अनुभवी शैलीदार फलंदाज पंकज फलकेने ४६ चेंडूंत २ षटकार व ६ चौकारांसह ६१ व जुनेद शेखने १0 धावा केल्या. कॉस्मो फिल्मकडून प्रीतेश चार्ल्सने २0 धावांत ४ गडी बाद केले. सतीश जामखेडकरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात कॉस्मो फिल्मचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे १२ षटकांत ४२ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून सुनील इंदाने याने १३ धावा केल्या. युनायटेड ब्रेव्हरीजकडून सागर मनोहर याने १४ धावांत ४ गडी बाद केले. श्रीकांत शिंदेने २ गडी बाद केले. अजय तोमर, हर्षद शिर्के व माणिक चोपरा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसºया लढतीत शहर ‘पोलीस ब’चा संघ १५.५ षटकांत ८0 धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून पंकज दळवीने २२ धावा केल्या. ग्रामीण पोलीसकडून अझर शेखने ३, प्रदीप पवार, अजय काळे व संदीप जाधव यांनी प्रत्येकी २, तर संजय सपकाळने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात ग्रामीण पोलीसने विजयी लक्ष्य १ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून अजय काळेने ३९ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ५३ व विशाल नरवडेने १४ धावा केल्या. उद्या, रविवारी सकाळी ८.३0 वाजता एसजीएसटीविरुद्ध मसिआ सामना होणार असल्याचे स्पर्धा सचिव राहुल टेकाळे यांनी कळवले आहे.