शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वडवळमध्ये ग्रामसभा उधळली

By admin | Updated: August 17, 2014 01:04 IST

वडवळ ना़ : स्वातंत्र्यदिनी येथे आयोजित ग्रामसभेत गारपिटीतील नुकसानीच्या अनुदानाचा वाद निर्माण झाला़ अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी

वडवळ ना़ : स्वातंत्र्यदिनी येथे आयोजित ग्रामसभेत गारपिटीतील नुकसानीच्या अनुदानाचा वाद निर्माण झाला़ अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांना हजर करा अशी मागणी केल्याने गोंधळ निर्माण झाला़ परिणामी ही ग्रामसभा तहकुब करण्यात येऊन २६ आॅगस्ट रोजी घेण्याचे ठरले़शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती़ यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य, नागरिक व ग्रामविकास अधिकारी पी़ व्ही़ रेड्डी उपस्थित होते़ ग्रामसभेस प्रारंभ होताच गारपिटग्रस्त शेतकऱ्यांनी अनुदानाचा मुद्दा उपस्थित केला़ परिणामी ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाला़ फेब्रुवारी- मार्चमध्ये झालेल्या गारपिटीत रबी पिकाबरोबरच टोमॅटो व इतर भाजीपाल्याचेही नुकसान झाले़ या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले असता तलाठी व महसूल मंडळ अधिकाऱ्यांनी ते काम पूर्ण केले़ हे पंचनामे वरिष्ठांकडे सादर करण्यात आले़ या पंचनाम्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांऐवजी अन्य शेतकऱ्यांचाच भरणा करण्यात आला आहे़ ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कुठल्याही फळ झाडाचे नुकसान झाले नाही, ज्यांची जमीन पडिक आहे़ तसेच ज्यांच्या शेतात संपूर्णपणे ऊस आहे, अशा शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश करण्यात आला़ त्यामुळे शासनाच्या वतीने सध्या अनुदान देण्याचे काम सुरु आहे़ चुकीच्या पंचनाम्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत़ अनुदान यादीतील १३५२ पैैकी ३१८ खातेदारांना २४ लाख ४२ हजार ५०० रूपयांचे अनुदान वाटप सुरु आहे़ या खातेदारांमध्ये एकाच घरातील तिघा-चौघा जणांचा समावेश आहे़ खरोखर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली़मंजूर यादीची चौकशी करून यातील दोषींवर कार्यवाही करण्यात येईल़ अनुदानापासून वंचित असलेल्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे चाकूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले़(वार्ताहर)