शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या तयारीमुळे पदवीधरांचे मतदान सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:17 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर गटातील १० जागांसाठी चार जिल्ह्यांतील ५६ केंद्रांवरील ८४ बुथवर सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर गटातील १० जागांसाठी चार जिल्ह्यांतील ५६ केंद्रांवरील ८४ बुथवर सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. पहिल्या टप्प्यातील अनुभवामुळे या टप्प्यात विशेष खबरदारी घेण्यात आली होती. यामुळे एकाही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी सांगितले.विद्यापीठातील अधिसभेतील पदवीधर गटासाठी सोमवारी मतदान झाले. यात एकूण २९ हजार ५०० मतदार मतदानासाठी पात्र ठरले होते. तर खुल्या प्रवर्गातील ५ आणि राखीव प्रवर्गातील ५ जागांसाठी तब्बल ५८ उमेदवार रिंगणात होते. यात सर्वाधिक उमेदवारांची गर्दी खुल्या प्रवर्गात होती. ५ जागांसाठी तब्बल ३३ उमेदवारांनी आपले नशीब अजमावले आहे. याशिवाय अनुसूचित जाती गटातील एका जागेसाठीही ९ उमेदवारांमध्ये लढत झाली. यामध्ये प्रा. सुनील मगरे आणि पंकज भारसाखळे यांच्यात थेट सामना झाला. तर प्रकाश इंगळे, प्रशांत पवार, अ‍ॅड. शिरीष कांबळे आणि डॉ. बाबासाहेब भालेराव यांनीही चांगलीच टक्कर दिलेली आहे. मागील टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळी उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपपरिसरातील मतदारांच्या मतपत्रिका दुपारनंतर पोहोचल्या होत्या. याशिवाय अनेक मतदान केंद्रांवर अप्रशिक्षित कर्मचाºयांमुळेही गोेंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मात्र यानंतर पदवीधरांच्या वेळी विद्यापीठ प्रशासनाने गंभीरपणे नियोजन करून सर्व घटकांचे सहकार्य घेऊन निवडणूक सुरळीतपणे पार पाडली. यात प्रत्येक मतदान केंद्रांवर केंद्रप्रमुख म्हणून प्राध्यापक, वर्ग-१ चे अधिकारी दिले. तसेच इतर कामांसाठीही पाच कर्मचारी प्रत्येक बुथसाठी दिले होते. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यासाठी निवडणूक निरीक्षक, सीसीटीव्हीची सक्षम यंत्रणा, कर्मचाºयांच्या राहण्याची व जेवण्याची चोख व्यवस्था केली होती. या सर्व बाबींवर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांचे बारकाईने लक्ष होते. कोणत्याही केंद्रातून तक्रार आली तर त्याची तात्काळ दखल घेण्यात येत होती. दिवसभर एकाही मतदान केंद्रावर गडबड झाली नसल्याचे डॉ. पांडे यांनी स्पष्ट केले.७ डिसेंबर रोजी मतमोजणीपदवीधर अधिसभेतील झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी सकाळी १० वाजेपासून होईल. मागील वेळी झालेला गोंधळ टाळण्यासाठी यावेळी २५ टेबल लावण्यात येणार असल्याचेही डॉ.पांडे यांनी सांगितले. मतमोजणीत गोंधळ होऊ नये, पुरेशा जागा उपलब्ध असावी, यासाठी मतमोजणी क्रीडा विभागाच्या सभागृहात होणार आहे.