शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर निवडणूक: मराठवाड्यात विक्रमी ६१ टक्के मतदान

By | Updated: December 3, 2020 04:08 IST

औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी प्राथमिक आकडेवारीनुसार आठ जिल्ह्यांतील ६१ टक्के पदवीधर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावून निकालाची चुरस ...

औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी प्राथमिक आकडेवारीनुसार आठ जिल्ह्यांतील ६१ टक्के पदवीधर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावून निकालाची चुरस वाढविली आहे. मतदानाची अंतिम टक्केवारी ६५ टक्क्यांच्या आसपास जाईल, असे प्रशासकीय मत आहे. २०१४ सालच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत ‘रेकॉर्डब्रेक’ मतदान झाले आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

२०१४ मध्ये पदवीधर निवडणुकीसाठी ३९ टक्के मतदान झाले होते. यावेळी जास्त मतदान झाल्यामुळे मतमोजणी जास्त वेळ चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागच्यावेळी मतमोजणीच्या ४ फेऱ्या झाल्या होत्या. यावेळी ५६ टेबलवर मतमोजणीची व्यवस्था केल्यामुळे कमी वेळ लागेल, असा दावा यंत्रणा करीत आहे. ३ डिसेंबर रोजी ६१ टक्के मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण, भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासह ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडी विरुध्द महायुती अशा पक्षीय स्वरूपाने या निवडणुकीत प्रचार केला गेला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मतदानाचा उत्साह दिसला. अनेक शहरांमध्ये यंदा मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसले.

शेवटच्या तासात वाढले मतदान

३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख २७ हजारांच्या आसपास पदवीधर मतदारांनी मतदान केल्याचा अंदाज आहे. ५० टक्के महिला पदवीधर आणि ६० टक्के पुरुष पदवीधर मतदारांनी मतदान केले. दुपारी ४ वाजेपर्यंत ५३.३० टक्के मतदान झाले होते. ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. या शेवटच्या तासात सुमारे ७ ते १२ टक्के मतदान वाढल्याचा अंदाज आहे. काही मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान सुरू होते.