शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

गोविंदा आला रे...

By admin | Updated: August 26, 2016 00:40 IST

जालना: शहरासह जिल्ह्यात दहीहंडी उत्सव अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. तरूणार्इंने यात पुढाकार घेतल्याने शहर ‘गोविंदा रे गोपालाने’ दुमदुमून गेले होते

जालना: शहरासह जिल्ह्यात दहीहंडी उत्सव अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. तरूणार्इंने यात पुढाकार घेतल्याने शहर ‘गोविंदा रे गोपालाने’ दुमदुमून गेले होते. शहरातील प्रमुख चौकांत दहीहंडी फोडून जल्लोष करण्यात आला. अंबड, भोकरदन,मंठा, परतूर, बदनापूर, घनसावंगी येथे दहीहंडी उत्सव पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजे दहीहंडी केली जाते. शहरातील कृष्ण मंदिरांसोबतच सेवाभावी संस्था व राजकीय पक्षांनीही यंदा दहीहंडी कार्यक्रमासाठी मोठा पुढाकार घेतल्याचे दिसून आले. जुना जालन्यात गवळी समाजाच्या वतीने श्रीकृष्णाच्या प्रतिमेची ढोलताशांच्या गजरात मोठी मिरवणूक काढण्यात आली. लाड गवळी समाजाच्या वतीनेही दहीहंडी उत्साहात पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. सजविलेलया वाहनात भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भजनी मंडळानेही भजने सादर केली. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. प्रथेप्रमाणे ढोलताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकी दरम्यान दहा ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आली. यात प्रामुख्याने गणपती चौक, गणपती मंदिर, शास्त्री मोहल्ला बाजार चौकी, आनंदीस्वामी गल्ली आणि गवळी पंचायत वाड्यात दहीहंडी फोडनू गोपाळकाला करण्यात आला. यावेळी लाड गवळी समाजाचे अध्यक्ष जगन्नाथ गोगडे, सचिव सुनील सतकर, भजनाचे प्रमुख दशरथ सुपारकर, गणेश सुपारकर, गणेश लाड, रवी लाड, कैलास लाड, बालाजी लाड, गणेश सुपारकर, लखन वाघमारे, महेश गोगडे, अक्षय सतकर, अनिल गोगडे, राजेश सतकर, उमेश गोगडे, आदर्श सतकर, शुभम वाघमारे, राहुल सुपारकर यांच्यासह शेकडो समाजबांधवांनी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. गणपती गल्ली चौकांतही गणेश सुपारकर मित्र मंडळाच्या वतीने मोठी दहीहंडी फोडण्यात आली. कोळेश्वर गल्ली भागातही दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी संतोष रेगुडे, गणेश जोशी, अमोल देशमुख, गणेश लोखंडे, ऋषभ खेरूडकर, अनिकेत साहनी, अजिंक्य कोळेश्वर, प्रथमेश शहाणे यांच्यासह महिला मंडळ तसेच रहिवाशांची मोठी उपस्थिती होती. नवीन जालना भागातील नंदी मंदिरात मोठी दहीहंडी पारंपरिक उत्साहात फोडण्यात आली. भाविकांना गोपाळकाला वाटण्यात आला. बडीसडक, शिवाजी पुतळा, मोदीखाना, कॉलेज रोड आदी ठिकाणी डीजेच्या तालावर दहीहंडी फोडण्यात आली. मोहिनी चौकात पद्मशाली युवा मंचच्या वतीने दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी गणेश वल्लाकट्टी, आशीष संभार, छोटू चित्राल, बालाजी गुडूर, सुरेश संभार, शशी ऐटला, शंकर दुडका यांच्यासह सदस्यांची मोठी उपस्थिती होती.भोकरदन शहरातही दहीहंडीचा कार्यक्रम गुरूवारी उत्साहात पार पडला. सायंकाळी युवकांनी एकत्र येत गोविंदाचा गजर करीत दहीहंडी फोडली. शहरातील विविध भागात गोपाळ्या काल्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात आला. अंबड शहरातील दहीहंडीचा मोठा उत्साह दिसून आला. मत्स्योदरी देवी मंदिर परिसरातही विविध कार्यक्रम पार पडले. जालना शहरातील कन्हैयानगरातील श्री कृष्ण हिंदी विद्या मंदिरात दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी विनोद यादव, योगेश भगत, प्रदीप दांडगे, गोकूळ संैदर आदींची उपस्थिती होती. गांधी चमन परिसरातील किडस केंब्रिज शाळेत दहीहंडी पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाची वेशभुषा परिधान केली होती. यावेळी संचालिका अलका गव्हाणे यांच्यासह शिक्षक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नजिक पांगरी येथील कै.नानासाहेब पाटील विद्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्याध्यापक वाघ यांच्यासह शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.