शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

‘गोविंदा... गोविंदा’चा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:06 IST

‘गोविंदा, गोविंदा’चा प्रचंड जयघोष, ‘मैं हू डॉन, ‘झिंग झिंग झिंगाट’ अशा एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण आणि दहीहंडी फोडण्यासाठी रचणारे थरावर थर, अशा जल्लोषमय वातावरणात सोमवारी शहर अवघे गोविंदामय झाले. सहा ते सात थर लावण्यासाठी गोविंदा पथकांची स्पर्धा आणि युवकांच्या उत्साहामुळे वातावरण रंगले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘गोविंदा, गोविंदा’चा प्रचंड जयघोष, ‘मैं हू डॉन, ‘झिंग झिंग झिंगाट’ अशा एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण आणि दहीहंडी फोडण्यासाठी रचणारे थरावर थर, अशा जल्लोषमय वातावरणात सोमवारी शहर अवघे गोविंदामय झाले. सहा ते सात थर लावण्यासाठी गोविंदा पथकांची स्पर्धा आणि युवकांच्या उत्साहामुळे वातावरण रंगले होते.शहरातील कॅनॉट प्लेस, बजरंग चौक, टीव्ही सेंटर चौक, शहागंज, गुलमंडी, निरालाबाजार, पुंडलिकनगर, आविष्कार कॉलनी येथे दहीहंडी महोत्सव सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. याठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी होणारा थरांचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ५१ वर्षांची गोविंदा पथकाची परंपरा असलेल्या जबरे हनुमान मंडळाने जाधवमंडी येथे पाच थर रचत दहीहंडी फोडून जल्लोष केला.कॅनॉट प्लेस येथे स्वाभिमान क्रीडा मंडळातर्फे आयोजित दहीहंडी महोत्सव पाहण्यासाठी शेकडो आबालवृद्धांनी गर्दी केली होती. गोविंदा पथकांच्या गर्दीने कॅनॉट प्लेस परिसर गर्दीने फुलून गेला होता. जागा मिळेल तेथे गोविंदा पथकांच्या मनोऱ्यांचा थरार पाहण्यात प्रत्येक जण हरवून गेला होता. उत्तरमुखी हनुमान गोविंदा पथक (बुढीलाईन), जनसेवा गोविंदा पथक (जुना मोंढा), माऊली ग्रुप बिडकीन, जयराणा गोविंदा पथक (नवाबपुरा), रामराज्य गोविंदा पथक (छावणी), जयभद्रा राजाबाजार मित्र मंडळासह अनेक पथकांनी सलामी दिली. यावेळी ४० सेकंदांत सहा थर लावणाºया भवानीनगर गोविंदा पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी महोत्सवाचे अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, विशाल दाभाडे, कुणाल मराठे आदींची उपस्थिती होती.आविष्कार कॉलनी, बजरंग चौकआविष्कार कॉलनी येथे संस्कृती दहीहंडी महोत्सवात गोविंदा पथकांचा उत्साह दिसून आला. याप्रसंगी मयूर वंजारी, अविनाश पवार, चंद्रशेखर वानखेडे, सचिन अमोलिक, सचिन राऊत, मयूर विधाते आदी उपस्थित होते. बजरंग चौक येथे नेमो दहीहंडी महोत्सवात गोविंदा पथकांचे कौशल्य पाहण्यात नागरिक हरवून गेले. नगरसेवक शिवाजी दांडगे, गणेश नावंदर, नितीन खरात, प्रल्हाद पारटकर, राहुल खरात, दिगंबर खरात, प्रदीप ठाकरे आदी उपस्थित होते. याठिकाणी गोविंदा पथकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रबरी मॅट टाकण्यात आला होता.टीव्ही सेंटर चौकटीव्ही सेंटर चौकात चारही बाजूंनी नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. याठिकाणी धर्मरक्षक दहीहंडी महोत्सवाप्रसंगी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, एसीपी गोवर्धन कोळेकर, डॉ. सतीश साबळे, अभय शिंदे, एव्हरेस्ट शिखर सर करणारी मनीषा वाघमारे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सागर मगरे, स्वप्नील तांगडे, संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब थोरात, अध्यक्ष बद्रीनाथ ठोंबरे, नितीन अजमेरा, ज्ञानेश्वर शेळके यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित क्रीडापंटूचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीSocialसामाजिक