शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना घरपोच आरोग्य सेवा मिळावी ही सरकारची तळमळ -मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लासूर स्टेशन : सर्वसामान्य रुग्ण अत्यावश्यक उपचारासाठी फिरूशकत नाही, त्यामुळे आरोग्य सेवेचा लाभ त्याला मिळत नाही, ...

लोकमत न्यूज नेटवर्कलासूर स्टेशन : सर्वसामान्य रुग्ण अत्यावश्यक उपचारासाठी फिरूशकत नाही, त्यामुळे आरोग्य सेवेचा लाभ त्याला मिळत नाही, हे आमच्या लक्षात आले. आता रुग्णांना घरपोच सेवा मिळाली पाहिजे, ही आमची तळमळ आहे आणि हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. एखादा रुग्ण येऊन आम्हाला भेटतो व तो म्हणतो की, तुमच्यामुळे माझा जीव वाचला, तो क्षण मुख्यमंत्री होताना होणा-या आनंदापेक्षा जास्त आनंद देणारा असतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील गीताबन येथे आ. प्रशांत बंब यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आरोग्य व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सराला बेटाचे मठाधिपती ह.भ.प. रामगिरी महाराज, वेरूळ येथील महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, अमेर साहब, कैलासगिरी महाराज, डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.या महाआरोग्य शिबिरात एक लाख तीस हजारांहून अधिक रुग्णांनी तपासणी करून घेतली. त्यासाठी देशपातळीवरील नामांकित मुख्य व इतर १७५० डॉक्टरांचे पथक सकाळी सात वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यरत या महाशिबिरात परिश्रम घेत आहे.किरकोळ आजारावरील रुग्णांवर जागेवरच औषधोपचार करण्यात आला, तर गंभीर आजार असणाºयांना पुढील संदर्भसेवा ठराविक नियोजनानुसार करण्यात येणार आहे.एक ते नऊ डिसेंबरदरम्यान चाललेल्या या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्यदूत तथा समन्वयक रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या यांच्यासह १७ समित्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यांच्यात दीड हजार कार्यकर्ते, स्वयंसेवक होते.गिरीश महाजन यांनी बंब यांनी आयोजित केलेला कार्यक्रम नजर लागण्यासारखा असल्याचे म्हटले, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोग्यमंत्री गिरीश महाजन व आ. बंब यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींमुळे मोठ्या आर्थिक खर्चाचे उपचार रुग्णांना सहजतेने उपलब्ध होत असल्याचे सांगून कौतुककेले.नाना, मी कमी खातो तरी माझे पोट मोठे...आजार झालेल्यांच्या पाठीशी सरकार तर आहेच; परंतु आजार होऊ नये म्हणून जेवण गरजेपुरते करा, पोट ताणेपर्यंत खाऊ नका, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.यावर मिश्किलपणे टिपणी करताना मुख्यमंत्री म्हणाले की, नाना, मी कमी खातो तरी माझे पोट मोठे आहे, असे म्हणताच हंशा पिकला.आजार होऊ नये म्हणून काळजी घ्या, स्वच्छतेच्या माध्यमातून परिसर रोगराईमुक्त करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.