शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:12 IST

विद्यमान सरकारचे धोरण शेतकरी व सहकार विरोधी असून, सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विद्यमान सरकारचे धोरण शेतकरी व सहकार विरोधी असून, सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. येथील समर्थ सहकारी बँकेच्या नूतन वास्तू स्थलांतरानिमित्त रविवारी आयोजित सभासद व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.कार्यक्रमास माजी मंत्री आ. राजेश टोपे, विक्रम काळे, रामराव वडकुते, माजी आ. कैलास गोरंट्याल, सुरेशकुमार जेथलिया, चंद्रकांत दानवे, कपिल आकात, डॉ. बी. आर. गायकवाड, सतीश टोपे, राजेश राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.पवार म्हणाले, की सहकार क्षेत्रात चांगले काम करणाºया संस्थांनी दीर्घकाळ परिश्रम घेऊन सहकार चळवळीला बळ देण्याचे काम केले आहे. मात्र, लहान-मोठ्या सहकारी व नागरी बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण करून सहकार चळवळ संपविण्याचा सरकारचा डाव आहे.सत्तेत असणाºया शिवसेनेने सरकारला जनहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्याऐवजी तेच रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. त्यामुळे शिवसेना सत्तेत आहे की विरोधात हेच कळत नाही, अशी टीका त्यांनी केली. पुरोगामी विचारांचे लोक, पत्रकार यांचे खून होत असताना तपास लागत नाही, यास जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वेळी टोपे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.नागरी बँकांना कर्जमाफीतून वगळणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. शेतकरी, गरजू व होतकरू माणसांना उभे करण्याचे काम समर्थ बँकेच्या माध्यमातून सुरू असून, ही परंपरा या पुढेही कायम राहील, असे टोपे यांनी सांगितले. या वेळी निसार देशमुख, रघुनाथ तौर, संजय कणके, संजय काळबांडे, बबलू चौधरी, संजय दाड, माऊली लाटे, बाबासाहेब राऊत यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, बँकेचे सभासद व शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.