शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय टँकरच्या पाण्याचा ‘गोरखधंदा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:47 IST

खंडाळावासियांचा घसा कोरडा : वाड्या, वस्त्यांऐवजी खाजगी विहिरीत भरणा

मोबीन खानवैजापूर : तालुक्यातील खंडाळा गावात येणाऱ्या शासकीय टँकरच्या पाण्याचा गैरवापर होत असून काही पुढाºयांच्या कृपेने हे टँकर तहानलेल्या वाड्या, वस्त्यांवर न पाठविता स्वत:च्या खाजगी विहिरीत खाली करण्यात येत आहे. नंतर या पाण्याचा गोरखधंदा करण्यात येत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.तालुक्यातील खंडाळा परिसरात पाणीटंचाईचे भीषण स्वरूप येथील वाड्या-वस्त्यांना भेट दिल्यानंतर लक्षात येते. याठिकाणी ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे पाणी समस्येने रौद्ररूप धारण केले आहे. भवरबेंदजवळ असलेली आदिवासी वस्ती देखील पाणीटंचाईतून सुटलेली नाही. या वस्तीजवळ असलेल्या सुभाष सूर्यवंशी यांच्या विहिरीतून हे लोक पाणी भरतात. परंतु ही विहीरदेखील कोरडी पडली. पंचायत समितीने खंडाळा गावातील वाघचौरे वस्ती, भिंगी रस्ता, जेजूरकर वस्ती, मगरवस्ती, भवरबेंद, लेंडी वस्ती, कोल्ही रस्ता आणि थोरात वस्तीसाठी तीन महिन्यांपासून ३ टँकरने दिवसातून सहा खेपा पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, येथील ग्रामपंचायतमधील काही सदस्यांनी ग्रामसेवकाला हाताशी धरून केवळ एकच टँकर वाड्या-वस्त्यावर पाठविण्यात येते. दोन टँकरचे पाणी शेती भिजवण्यासाठी वापरले जाते. लॉगबुकवर मात्र खोटी माहिती भरून दिली जाते.काही सदस्यांनी या टँकरचे पाणी स्वत:च्या विहिरीत खाली करुन नंतर खाजगी टँकरमध्ये भरून या पाण्याचा गावात विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केल्याची तक्रार येथील माजी जि.प.सदस्य सूरजनाना पवार यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होत नाही तोपर्यंत पाणीपुरवठा करणाºया टँकरचे देयक अदा करु नये. परिसरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईला नागरिक त्रासले असून भर पावसाळ्यात वणवण भटकण्याच्या त्रासाला कंटाळून अनेक ग्रामस्थांनी आपले बिºहाड पाणी उपलब्ध असलेल्या शेताकडे नेले आहे. स्वार्थी राजकारणामुळे गावचा विकास होत नसल्याच्या भावना गावकºयांनी व्यक्त केल्या.प्रतिक्रियाग्रामस्थांनी गटविकास अधिकाºयांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन खंडाळा येथील ग्रामसेवकाकडून लॉगबुक मागविले असून या प्रकरणाची आम्ही चौकशी सुरू केली आहे.-के. पी. कडपाणीपुरवठा अभियंता, पंचायत समितीया प्रकरणी गटविकास अधिकाºयांना चौकशी करुन तातडीने अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे.-प्रभाकर बारसे, उपसभापती, पंचायत समितीफोटो.....भीषण दुष्काळाचे भयंकर वास्तव दर्शविणारे तालुक्यातील खंडाळा येथील आदिवासी वस्तीवरील हे दृश्य.अंगावर काटे उभे करणारे आहे.भर पावसाळ्यात घोटभर पाणी मिळवण्यासाठी जिवावर बेतणारी लढाई, हवालदिल झालेले डोळे,थरथरत्या हातात पाण्याचा हंडा,४० फूट खोल विहिरीतून पाणी काढण्यासाठी चाललेली जीवघेणी कसरत जणू रोजचेच झाले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी