शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव शासन नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने; पण उत्साहात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 19:34 IST

खबरदारी व सुरक्षितता लक्षात घेऊन नियमांची अंमलबजावणी करीत यंदा शहरात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देगणेश महासंघ उत्सव समिती करणार प्लाझ्मादान जनजागृतीसर्व नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने; पण उत्साहात साजरा होणार

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खबरदारी व सुरक्षितता लक्षात घेऊन नियमांची अंमलबजावणी करीत यंदा शहरात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात रक्तदान शिबीर, प्लाझ्मादान जनजागृती, आरोग्य शिबीर घेण्यात येणार असल्याची माहिती गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर तुलशीबागवाले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

तुलशीबागवाले यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगद्वारे राज्यातील प्रत्येक गणेश महसंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यात त्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवणे, श्रींच्या लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करणे, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर घेणे, शक्यतो मंदिर, हॉलमध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करणे आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. 

सर्व नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने; पण उत्साहात साजरा करण्याचा आम्ही मुख्यमंत्र्यांना शब्द दिला आहे. हेच आवाहन आम्ही आता गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना व गणेशभक्तांना करीत आहोत. नंदकुमार घोडेले म्हणाले की, सार्वजनिक गणेश मंडळांनी शक्यतो मंदिरात किंवा हॉलमध्ये गणपती बसवावा व देखावा करू नये. सामाजिक आरोग्य उपक्रम राबवावे. कोरोनाची तपासणी शिबीर ठेवावे. यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, प्रफुल्ल मालानी, तनसुख झांबड, सुरेश टाक, सचिन खैरे आदी उपस्थित होते. 

आगमन, विसर्जन मिरवणूक नाही निघणार पृथ्वीराज पवार यांनी सांगितले की, यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. श्रींचे आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही. शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात यावी.  

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या