शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

औरंगाबाद येथील एमआयएमच्या तीन गोंधळी नगरसेवकांना शासनाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:01 IST

मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या तीन नगरसेवकांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये मनपाच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व असा गोंधळ घातला होता. तत्कालीन महापौरांच्या अंगावर प्लास्टिकच्या खुर्च्या भिरकावणे, राजदंड पळवून नेणे, सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करणे आदी प्रकार या नगरसेवकांनी केले होते. या गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता.

ठळक मुद्देआठ दिवसांत खुलासा द्या : अन्यथा पद रद्द करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या तीन नगरसेवकांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये मनपाच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व असा गोंधळ घातला होता. तत्कालीन महापौरांच्या अंगावर प्लास्टिकच्या खुर्च्या भिरकावणे, राजदंड पळवून नेणे, सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करणे आदी प्रकार या नगरसेवकांनी केले होते. या गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. याची गंभीर दखल घेत शासनाने गुरुवारी तिन्ही नगरसेवकांना नोटीस बजावली असून, त्यामध्ये आठ दिवसांत खुुलासा सादर करावा अन्यथा नगरसेवकपद रद्द करण्यात येईल, असे म्हटले आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने बजावलेल्या नोटीसमुळे एमआयएमच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.ज्या नगरसेवकांना नोटीस बजावली आहे त्यात सय्यद मतीन (वॉर्ड क्र. २०-जयभीमनगर, घाटी), शेख जफर (वॉर्ड क्र. ६०- इंदिरानगर-उत्तर बायजीपुरा) आणि अपक्ष तथा एमआयएम समर्थक अजीम अहेमद (वॉर्ड क्र. ४३- शरीफ कॉलनी) यांचा समावेश आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये मावळते महापौर बापू घडमोडे यांची शेवटची सभा सुरू असताना एमआयएम नगरसेवकांनी गोंधळ घातला होता. महापौरांसमोरील राजदंड ओढत असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. अजीम अहेमद यांनी सुरक्षा रक्षकाला धक्का देऊन खाली पाडले होते. त्यानंतर जफर यांनी थेट महापौरांच्या अंगावर प्लास्टिकच्या खुर्च्या भिरकावल्या होत्या. सय्यद मतीन यांनी राजदंड पळविला होता. या प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला. मतीन आणि अजीम यांना सिटीचौक पोलिसांनी अटकही केली होती.गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आदेश तत्कालीन महापौर घडमोडे यांनी प्रशासनास दिले होते. मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी सभागृहात घडलेल्या घटनांचा सविस्तर तपशील शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केला होता.आणखी चार जणांचा समावेशमनपा प्रशासनाने शासनाकडे एमआयएमच्या एकूण ८ नगरसेवकांचे अहवाल पाठविले आहेत. यातील काहींनी अतिक्रमण हटावात हस्तक्षेप केला आहे. अधिकाºयांवर हल्ला चढविणे, अतिक्रमण हटविताना विरोध दर्शविणे आदी आरोप एमआयएम नगरसेवकांवर आहेत. त्यातील तीन जणांनाच गुरुवारी शासनाने नोटीस बजावली आहे.