शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील वर्ग-२ च्या जमिनींच्या विक्री परवानगीमध्ये शासनाचे २२ लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 19:16 IST

जिल्ह्यातील वर्ग-२ च्या जमिनींच्या विक्री परवानगीमध्ये शासनाचे सुमारे २२ लाख ८१ हजार ६८६ रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान कसे व केव्हा भरून घेणार, असा प्रश्न आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील वर्ग-२ च्या जमिनींच्या विक्री परवानगीमध्ये शासनाचे सुमारे २२ लाख ८१ हजार ६८६ रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान कसे व केव्हा भरून घेणार, असा प्रश्न आहे. १८ जानेवारी रोजी वर्ग-२ चे जमीन प्रकरण चव्हाट्यावर येऊन १ महिना पूर्ण झाला असून, यामध्ये निलंबित उपजिल्हाधिकार्‍यांपैकी एकाने कोर्टात धाव घेतली आहे, तर दुसर्‍या अधिकार्‍याने मौन धारण केले आहे. कारणे दाखवा नोटीस दिलेल्या दोघांनी अद्याप खुलासा केलेला नाही.

निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे व तत्कालीन उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांनी सिलिंग जमिनीची विक्री परवानगी देताना २० लाख ८१ हजार ६८६ रुपये इतक्या अनर्जित रकमेचा कमी भरणा करून घेत जमीन विक्रीची परवानगी दिली, असा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे, तर निलंबित उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी इनाम जमिनीची विक्री परवानगी देताना ३०९ रुपयांचे शासनाचे नुकसान केले आहे, दुसर्‍या गायरान जमीन प्रकरणात विक्री परवानगी देताना गावंडे यांनी २ लाख ६८५ रुपये इतकी रक्कम भरणा न करून घेता शासनाचे नुकसान केले आहे. सध्या सुरू असलेल्या वादाच्या प्रकरणांत शासनाचे झालेले नुकसान कसे भरून घेणार, असा प्रश्न आहे. 

१० निलंबने केली आयुक्तांनी विभागीय आयुक्तांनी निलंबनाच्या अधिकारात मागील काही वर्षांत १० निलंबने केल्याची माहिती पुढे आली आहे. ७ प्रकरणे खात्याचे मंत्री आणि सचिवांशी निगडित आहेत, तर ३ प्रकरणे लाचलुचपत खात्याशी निगडित आहेत. ७ प्रकरणांमध्ये मंत्री आणि सचिवांनी निलंबनाचे आदेश आयुक्तांना दिले आहेत, तर ३ प्रकरणांत संबंधित अधिकारी लाचेच्या प्रकरणात तुरुं गात गेले होते. त्यामुळे आयुक्तांनी सदरील प्रकरणात त्या अधिकार्‍यांचे निलंबन केले होते. महसूल प्रधान सचिव विभागप्रमुख आहेत की विभागीय आयुक्त विभागप्रमुख आहेत, निलंबनाचे अधिकार कोणाला आहेत. हा विषय सध्या तरी संशोधनाचा झालेला आहे. 

पोलीस अभिप्राय मागणारनिलंबित उपजिल्हाधिकारी कटके यांनी आयुक्त डॉ.भापकर यांच्या विरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या अ‍ॅट्रॉसिटी व लाच मागितल्याच्या तक्रारीबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्या तक्रारीचा अभ्यास करून शहर पोलिसांनी शासनाकडे अहवाल पाठवून पुढील कार्यवाहीसंदर्भात मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांनी दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद