जालना : शहरातील २० कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते बांधकाम कामाचा शासकीय शुभारंभ पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.या प्रसंगी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिरुध्द खोतकर, जगन्नाथ काकडे, संतोष मोहिते, भाऊसाहेब घुगे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, अक्षय गोरंट्याल, महावीर ढका आदींची उपस्थिती होती.राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते जालना शहरातील राऊत नगर पेट्रोल पंप ते मामा चौक, टांगा स्टॅण्ड ते शिवाजी पुतळा रस्त्याचे सिमेट काँक्रीट बांधकाम करणे रुपये ३ कोटी ७५ लाख. मामा चौक, सिंधी पंचायत वाडा सिंधीबाजार अलंकार टॉकीज महावीर चौक, रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटने बांधकाम करणे रुपये १ कोटी ७३ लाख. बस स्थानक ते सुभाष चौक पाणीवेस ते शिवाजी पुतळा, सुभाष चौक, अलंकार, भारत ड्रेसेस रस्त्यांचे काँक्रीटने बांधकाम करणे रुपये ३ कोटी ५० लाख. मुथा बिल्डींग ते मंमादेवी ते चमन रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटने बांधकाम करणे रुपये २ कोटी २६ लाख. भोकरदन नाका ते राऊत नगर पेट्रोल पंप रस्त्यांचे सिमेंट कॉक्रीटने बांधकाम करणे रुपये ३ कोटी ७५ लाख. गांधी चमन ते मुक्तेश्वरद्वार रुपये २ कोटी ८० लाख खर्चाच्या या कामांचा शुभारंभ करण्यात आला.राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, शहरातील जनतेला सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण कटिबध्द असून, आगामी काळात शहरात विविध विकास कामे करुन शहराचा चेहरामोहरा बदलून टाकणार असल्याचे सांगितले.शहरातील मोती तलाव परिसराच्या विकासासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून भरीव तरतुद उपब्ध करुन घेण्याबरोबरच भुमिगत गटार योजनेसाठीही सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री खोतकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते.
शहरातील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाचा शासकीय शुभारंभ
By admin | Updated: January 3, 2017 23:31 IST