शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय दंतविद्यालयाने वर्षभरात दातांत भरली साडेसहा किलो चांदी

By admin | Updated: June 20, 2017 19:11 IST

चांदीच्या दागिन्यांची जेवढी लोकप्रियता आहे तेवढेच दंत उपचारातही चांदीला अनन्यसाधारण महत्व आहे. दात किडल्याने चांदी भरली असे नेहमीच ऐकण्यात येते. दंत आजारांच्या

संतोष हिरेमठ /ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 20 - आजघडीला सुमारे ३९ हजार रुपये प्रति किलोपर्यंत चांदीचा भाव आहे. चांदीच्या दागिन्यांची जेवढी लोकप्रियता आहे तेवढेच दंत उपचारातही चांदीला अनन्यसाधारण महत्व आहे. दात किडल्याने चांदी भरली असे नेहमीच ऐकण्यात येते. दंत आजारांच्या रुग्णांची संख्या पाहता रुग्णलायांमधून दातांमध्ये भरण्यात येणाऱ्या चांदीचेही प्रमाण मोठे आहे. एकट्या औरंगाबादेतील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात वर्षभरात साडेतीन हजार रुग्णांच्या किडलेल्या दातांत तब्बल साडेसहा किलो चांदी भरण्यात आली आहे.रुट कॅनॉल उपचार, दात-हिरड्यांमध्ये चांदी भरणे किंवा इतर वैद्यकीय साहित्यांचा वापर करून दात भरणे यासाठी खाजगी रुग्णालयांत उपचार घेणे गोरगरीबर, सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाही. परंतु शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय अशा रुग्णांना दंत उपचारासाठी आशेचा किरण ठरत आहे. घाटी रुग्णालयालगत असलेल्या या दंत रुग्णालयाकडे रुग्णांची पावले वळतात. दातांसाठी अपायकारक असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण अलीकडे वाढलेले दिसते. त्यामुळे लहान मुलांपासून वृद्धांमध्ये दात किडन्याचे प्रमाण दिसून येते. यातून अन्नपदार्थ चावण्यास अडचण निर्माण होते.दंत रुग्णालयात सर्व प्रकाराचे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे दररोज या ठिकाणी शहरासह जिल्ह्यातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. उपचारासाठी अनेक रुग्णांच्या दात आणि हिरड्यात चांदी भरण्याची वेळ येते. लहान मुलांसह प्रौढ, ज्येष्ठांच्या दातांतही चांदी भरली जाते. दातांमध्ये भरलेली चांदी अनेक वर्षे टिकते. चांदीसह इतर मिश्रणाचाही वापर केला जातो. महिन्याला दोनशे ते तीनशे रुग्णांच्या दातात येथील रुग्णालयातील तज्ज्ञ चांदी भरतात. वर्षभरात ३,६१० रुग्णमागील वर्षभराच्या कालावधीत ३ हजार ६१० रुग्णांच्या किडलेल्या दातांमध्ये चांदी भरण्यात आली आहे. किडलेल्या दाताच्या आकारानुसार चांदीचे प्रमाण ठरवले जाते. अडिच लाखांची चांदीदंत महाविद्यालयास ३० ग्रॅमच्या छोट्याशा डब्बीमध्ये चांदी मिळते. वर्षभरात अशा २२० डब्बींतील म्हणजे ६ हजार ६०० ग्रॅम चांदी रुग्णांच्या दातांमध्ये भरल्या गेली. सध्याच्या ३९ हजार रुपये प्रति किलोपर्यंत चांदीच्या दराने ही सुमारे अडिच लाखांची चांदी होते.चार किलो सिमेंटमहाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे म्हणाले, चांदीसह दातांमध्ये सिमेंटही भरण्यात येते. गेल्या वर्षभरात सुमारे चार किलो सिमेंट दातांमध्ये भरण्यात आले आहे. रुग्णालयात अत्याधुनिक दंतोपचार देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.