शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडे अपघात विमा भरपाई किचकट प्रक्रियेमुळे मिळेना!

By admin | Updated: January 25, 2017 00:47 IST

जालना : शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू अथवा अपंगत्व आल्यावर गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेतून मदत दिली जाते.

जालना : शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू अथवा अपंगत्व आल्यावर गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेतून मदत दिली जाते. वर्षभरात जिल्ह्यातील १०९ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी प्रस्ताव दाखल केले होते. मात्र, केवळ दहा शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे. ९९ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने कागदपत्रांची जमवाजमव करताना संबंधित शेतकरी त्रस्त आहेत.विमा मिळविण्यासाठी योजना चांगली असली तरी दोन लाख रूपयांसाठी विविध प्रकारची कागदपत्रे वेगवेगळ्या कार्यालयातून संकलित करावे लागतात. ग्रामीण भागात कागदपत्र सहज मिळत नसल्याने समस्या बिकट बनली आहे. बहुतांश शेतकरी विमा काढण्याकडे दुर्लक्ष करतात. आर्थिक विवंचनेमुळे विम्याचे हप्ते भरण्यास अडचणी येतात. दरम्यान, शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मदत मिळावी म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. या योजनेला शेतकऱ्यांचाही प्रतिसाद मिळत आहे. परंतु दरवर्षी विमा कंपनी बदलत असल्याने शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळण्यास मर्यादा येते. २०१५-२०१६ मध्ये जिल्ह्यात एकूण १०९ प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १०२ शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रस्ताव त्यांच्या कुटुंबियांनी तर दोन अपंगत्वाचे प्रस्ताव संबंधित शेतकऱ्यांनी दाखल केले. यासाठी लाभार्थी कुटुंबियांनी सातबारासह विविध १३ प्रकारची कागदपत्रे गोळा करून प्रस्ताव सादर केले.कृषी विभागाने प्रस्तावांचे संकलन करून संबंधित विमा कंपनीला ते पाठविले. त्यानुसार केवळ ९ मृत शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रूपये याप्रमाणे मदत मिळू शकली. इतर शेतकऱ्यांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. कृषी विभागातील संबंधित विभाग पाहणारे वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा जायका या सेवा पुरवठादार कपंनीने सदर प्रस्तावाचे संकलन केले असून, युनायटेड इशुरन्स ही कंपनी विमा वाटप करते. वर्षभरात १०९ प्रस्ताव दाखल होऊनही फक्त १० शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला. इतर शेतकऱ्यांच्या प्रस्तावाबाबत नेमके काय झाले याबाबत विमा कंपनीच सांगू शकेल असे त्यांचे म्हणणे आहे. प्रस्ताव पाठविल्यानंतर विमा कंपनी पुन्हा फेरतपासणी करून विमा द्यायचा की नाही निश्चित करते.गतवर्षीही ८७ प्रस्तावांपैकी फक्त आठ ते दहा शेतकऱ्यांना फायदा मिळाला. प्रस्तावांची तपासणी सुरू असल्याचे संबंधित विमाकडून सांगण्यात येते असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)