शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

सासू-सून संमेलनातून व्यक्त झाले मनातील गूज

By admin | Updated: August 1, 2014 01:06 IST

नांदेड : लोकमत सखीमंच आयोजित सासू-सुन हे संमेलन २८ जुलै रोजी शंकरराव चव्हाण सभागृहात उत्साहात संपन्न झाले. यावेळी सासू - सुनेतील व्यक्त झालेल्या भाव- भावनांनी नातेसंबंध अधिकच दृढ झाले़

नांदेड : लोकमत सखीमंच आयोजित सासू-सुन हे संमेलन २८ जुलै रोजी शंकरराव चव्हाण सभागृहात उत्साहात संपन्न झाले. यावेळी सासू - सुनेतील व्यक्त झालेल्या भाव- भावनांनी नातेसंबंध अधिकच दृढ झाले़ महानगरातील विभक्त कुंटुब पद्धतीमुळे ऱ्हास होत जाणारे नातेसंबध सांभाळण्याची मोठी गरज आहे़ सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या सखीमंचने यासंबंधाने पाऊल टाकून सासू, सुनेच्या मनातील गूज व्यक्त करायला लावले़ टीव्हीवरील मालिका व मोबाईलवरील संभाषणामुळे जवळच्या माणसांचे महत्व कमी होते की काय, अशी भिती निर्माण झाली आहे़ मात्र आजुनही सुनेला लेक व सासूला आई म्हणत आपले नाते जोपासणाऱ्या कुटुंबांची ओळख सखीमंचच्या या संमेलनातून झाली़ कार्यक्रमाच्या प्रारंभी श्वेता ठाकुर यांची ‘बाई मी लाडाची ग’ या गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले.त्यानंतर प्रथम फेरीला सुरूवात झाली. सासुने सुनेचा तर सुनेने सासूचा परिचय करून दिला. त्यानंतर ज्युनिअर आमिताभ बच्चन यांच्या अभिनयाला सखींनी भरपूर दाद दिली. तसेच केबीसीसारखा गेम- शो ही ज्यु. अमिताभ बच्चन यांनी सखींसाठी आयोजित केला. अनेक वेगवेगळ्या चित्रपटांच्या डायलॉगची मागणी सखींतर्फे ज्यु.अमिताभकडे केली. त्यांनी आपल्या खास शैलीत अमिताभचा अभिनय सादर केला़ त्यानंतर दुसऱ्या फेरीत सासू सुनेच्या विचारांची एकता पाहण्यात आली. सासू-सून या संमेलनात प्रथम विजेती जोडी मीनाक्षी हुरणे व प्रिया हुरणे, द्वितीय शोभा पांचाळ व राधिका पांचाळ, वंदना हुरणे व रेणुका कुबडे या संयुक्तरित्या विजेत्या ठरल्या. तृतीय कमल देशमाने व सुचिता देशमाने तसेच उत्तेजनार्थ बक्षीस अस्मिता मुक्कावार व सुदर्शना मुक्कावार यांना देण्यात आले. परिक्षक म्हणून माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रायोजक राईडवेल हिरो व श्री साई हिरो हे होते. ( प्रतिनिधी)